*देवणी भाजपनं छळल , नागेश मंडळाने खेळवल ! भाजपाशी संगनमत करून कांग्रेसने पळवल देवणी करासाठी पर्याय काय !*
----गिरीधर गायकवाड नागराळकर
देवणी : देवणी शहरातील विकासाच्या नावाखाली भारतीय जनता पक्षाचा कार्यकाल अतिशय दुदैवी राहिला आहे रस्ते पाणी अश्या जीवनावश्यक कामात मोठा निकृष्ट कामे करून लोकांचा सर्वांगीण विकास न पाहता देवणीकर यांना छळल आहे तर गरिबांचा मशिहा म्हणून काम करणारे नागेश जीवने मित्र मंडळ याने स्वार्थासाठी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा व कांग्रेस पक्षाला खेळवल आहे तर कांग्रेस पक्षाने आपली विरोधकांची भूमिका नगर पंचायत सभागृहात स्पष्टपणे न मांडता भाजपाशी संगनमत करून सर्वकाही पळवल आहे गेली पंचवार्षिक काळात विकासाचं तुणतुणे वाजवीत भाजपा ने "आपण दोघे भाऊ भाऊ मिळेल तेवढे वाटून खाऊ " अशी भूमिका कांग्रेस भाजपा व नागेश जीवने मित्र मंडळाची राहिल्याने देवणीची जनता पूर्ती वैतागली आहे व नव्या पर्यायी राजकीय शोधत आहे
देवणी भाजपाचा बाले किल्ला राहिला आहे कै गोपीनाथ राव मुंडे यांचा बराचं कार्यकाल देवणीत गेल्यामुळे त्यांच्या तालमितील कै गुंडापा धनुरे ,हवगिराव पाटील ,सारखे निस्वार्थ कार्यकर्ते घडले देवणी कराच्या नसानसात भाजपा च्या विचारांची पेरणी केली देवणी तालुका हेर मतदारसंघात असतांना कायमस्वरूपी भाजपाकडे राहिला देवणीला नेहमी सत्तेच्या विरोधात असलेला आमदार भेटला त्यामुळे देवणीचा विकास झाला नाही कै विलासराव देशमुख व कै गोपीनाथ मुंडे हे सख्खे मित्र असल्याने देवणीत मुंडे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात असल्याने कै विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना सुद्धा देवणी तालुक्याकडे लक्ष दिले नाही केवळ दोस्ती निभवली गोपीनाथ मुंडे सत्तेत आल्यानंतर हवगिराव पाटील यांच्या आग्रहामुळे देवणी सह अनेक तालुके निर्माण केले
परंतु तालुक्याच्या विकासाठी एम आय डी सी दाल मिल, असे काही मोठे प्रकल्प आले नाहीत सर्वसामान्य लोकांना रोजगार उपलब्ध होईल असे काही झाले नाही त्यामुळे देवणी तालुका विकासापासून शंभर टक्के वंचित राहिला आहे ना गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांची भाजपा राहिली ना विलासराव देशमुख यांच्या विचारांची कांग्रेस देवणीत राहिली नाही देवणी नेमकी कोणाची प्रश्न असा पडला आहे नागराळकर ,तळेगावकर ,भोपणीकर विळेगावकर यांची गावे फक्त देवणी तालुक्यात असली तरी यांचे कार्यक्षत्र हे उदगीर राहिले आहे देवणी तालुक्याच्या विकासात यांचे काहीच योगदान राहिले नसल्याने देवणीकर याना स्वीकारत नाहीत हे तितकेच शंभर टक्के खरे यांना आपल्या मायभूमीचे काहीच देणं घेणं नाही त्यांची कर्मभूमी सर्वकाही समजतात म्हणून त्यांना देवणीकर का म्हणून स्वीकार करावा हा मोठा प्रश्न आहे यांचा देवणी तालुक्यावर कसल्याच प्रकारचा प्रभाव नाही येथील राजकारणावर काहीच परिणाम पडत नाही म्हणून देवणीतील गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन यांची भाजपा विलासराव देशमुख यांची कांग्रेस संपताना दिसत आहे
कायम भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून असलेला देवणी तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असून सुद्धा देवणी कराच्या स्वप्नाची माती करण्यात देवणीची भाजपा येशसवी झाली आहे भावजी मेव्हण्याचा राजकारणात नेमकं कोणाचा सर्वांगीण विकास केला हे देवणीकराना पडलेलं कोड आहे देवणी नगर पंचायत अंतर्गत शतकोटी वृक्ष लागवड कोणी केली किती लाखाची केली 1कोटी 80 लाख रुपये खर्चून आणलेले पाणी देवणीकराना किती दिवस मिळाले यशवंतराव पाटील ते एम एस ए बीला जाणारा रस्ता किती दिवसात खराब झाला गटार किती दिवसात पडून गेले कचरा व्यवस्थापन करण्यासाठी पाच वर्षात किती वाहन खरेदी केली गेली त्यात कोणा कोणाचे कमिशन होते त्यांच्यात किती लाखोंचा भ्रष्टाचार झाला यांचा हिसाब 'किताब देवणी कर अगामी निवडणूक शंभर टक्के घेतील यात शंका नाही त्यासाठी देवणीकर यांना सक्षम पर्यायी राजकीय व्यवस्थेची गरज आहे