कुंचल्याचे चित्रकार*
*भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीला सजविलेला चित्रकार नंदलाल बोस
भारतीय कलेच्या नवजागरण आंदोलनाचे प्रमुख प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांच्या जन्म 3 डिसेंबर 1882 रोजी बिहारमधील खरगपूर या खेड्यात झाला. त्यांच्या वडिलाचे नाव पूर्णचंद्र व आईचे नाव क्षेत्रपणी.आईने बनविलेल्या मातीच्या खेळण्यापासूनच त्यांना कलेची प्रेरणा मिळाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावीच पूर्ण झाले. शिक्षणासाठी त्यांना अनेक विद्यालयात प्रवेश दिला गेला परंतु त्यांचं मन अभ्यासात लागत नव्हतं. त्यांना चित्रकलेची खूप आवड होती. सुधीरा देवी यांच्याशी लग्न झाले. कलकत्ता येथे अवनींद्रनाथ टागोरांच्या एक हुशार विद्यार्थी म्हणून नावलौकिक मिळवला. 'सती' या चित्राने ते 1907 मध्ये भारतभर प्रसिध्द झाले. तेव्हापासून रवींद्र शैलीचे चित्रकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या चित्रास पारितोषिक मिळाले. 1921 पासून शांतिनिकेतांमधील कलाविभागाचे संचालक म्हणून ते काम पाहू लागले.
नंदलाल पूर्णचंद्र बोस यांच्या चित्रप्रनालित देशी रंग, देशी कागद आणि देशी तंत्र यांचाच वापर असे. त्यांची चित्रे प्राचीन नसली तरी भारतीय संस्कृतीचा वारसा त्यांनी जपला आहे. त्याच्या चित्र शैलीवर टागोर बंधूंचा तसेच अजिंठ्याच्या चित्रकलेचा प्रभाव आहे त्यामुळे नंदलाल बोस यांना भारतीय चित्रकलेचे जनक मानले जाते. सर्वसामान्य माणसाला चित्रकलेची गोडी लागावी म्हणून 1913 साली त्यांनी स्वतः काढलेली चित्रे फक्त 25 पैशांत विकली.
नंदलाल बोस यांनी तीस वर्षाहून अधिक काळ शांतिनिकेतनमध्ये अध्यापन केले. त्यांनी भारतीय संस्कृतीची व परंपरेची ओढ असल्याने प्रामुख्याने रामायण, महाभारत यावर आधारित अनेक चित्र रेखाटली आहेत. त्यात अग्नी,
नल-दमयंती, कुरुक्षेत्र, अर्जुन, स्वर्णकुंभ, इ. गोकुळ व्रत, कुमारी व्रत यासारखीही त्यांची काही चित्रे व्यक्तिगत वैशिष्ट्ये पूर्ण आहेत. विष प्राशन करणारा शिव ,पार्थसारथी, द रिटर्न ऑफ बुद्ध, टेलर हरिपूर मालिका या चित्रात मदर अँड चाईल्ड, ताक घुसळणारी स्त्री, डफलीवाली, शिंपी, वेनिफणी करणारी स्त्री, विना वाजवणारी स्त्री, भाजी विकणारी स्त्री ही चित्रे सजावटीसाठी काढलेली आहेत. त्यात बारकावा त्यांनी घेतला नाही. पारंपरिक अजिंठा शैलीचे रेखाटन व आल्हाददायक रंग पद्धत त्यात दिसून येते.
महात्मा गांधीजींची भेट झाल्यानंतर राष्ट्रीयत्वाची एक प्रबळ प्रेरणा त्यांना मिळाली. बहुजन समाज आकृष्ट करू शकतील अशी चित्रे त्यांनी त्या प्रेरणेतून काढली. ही सर्व चित्रे अर्थपूर्ण प्रभावी व बोलकी वाटतात. भारतीय लोकजीवनातील अत्यंत साध्या-सुध्या घटकांना त्यांनी चित्ररूप दिले आहे. लोकसंगीत, कारागीर, शेतकरी अशी जवळपास 60 चित्रे या प्रकाराची आहेत. ही चित्रे 'हरिपूर पोस्टर्स' या नावाने ओळखली जातात. शांतिनिकेतनमधील भिंतीवर कोरलेली भित्तिलेप चित्रे ही त्यांच्या शैलीच्या प्रगल्भतेची साक्ष देतात. चित्र साधनांचा कमीत कमी वापर करून भारतीय परंपरेची व चित्रातील अलंकारिकता त्यांनी जपली आहे.नंदलाल बोस यांना भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीला सजविण्याची संधी मिळाली.ही संधी त्यांना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिली.चित्रकार नंदलाल बोसने हे काम पूर्ण केल्यामुळे जगभर त्यांची प्रशंशा झाली . कलकत्ता येथील 'इंडियन म्युझियम', 'आशुतोष म्युझियम ऑफ आर्ट शांतिनिकेतन म्हैसूरच्या जगनमोहन प्रासारातील चित्रवीथि इ. ठिकाणी जतन करून ठेवल्याआहेत.
नंदलाल बोस यांनी आसपासची चलती फिरती माणसे, गाई-बकऱ्या, पशु-पक्षी यांच्या बारकाईने अभ्यास करून त्यांच्या प्रत्यक्ष रेखाटनातून प्रभुत्व दिसून येते. कलकत्ता बनारस विश्वभारती विद्यालयांनी सन्माननिय डॉक्टरेट देऊन गौरविलेला हा चित्रकार. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण 'किताब देऊन गौरव केला. 16 एप्रिल 1966 मध्ये त्यांचे शांतिनिकेतन येथे निधन झाले.
चित्रकार/कवी: नादरगे चंद्रदीप बालाजी
श्री पांडुरंग विद्यालय, कल्लूर
ता. उदगीर, जि. लातूर
मो. 8605776478