लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची बदली व नवीन जिल्हाधिकारी पदी बी.पी.पृथ्वीराज
लातूर: लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी परभणी येथील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले बी.पी.पृथ्वीराज हे लातूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
राज्याच्या अप्पर मुख्य सचिवांनी परिपत्रक काढत या संदर्भात माहिती दिल
जी.श्रीकांत यांनी कोरोना काळात लातूर जिल्ह्यात विविध उपाययोजना राबवत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणली होती. जी. श्रीकांत यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. जी श्रीकांत यांना सा.युवा मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने जाहीर आभार व नवीन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.यांचे हार्दिक स्वागत.