लोहा, कंधार मतदार संघातील पदवीधर मतदान केंद्राला सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी भेटी देऊन घेतला आढावा

 लोहा, कंधार मतदार संघातील पदवीधर मतदान केंद्राला सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी भेटी देऊन घेतला आढावा



 लोहा प्रतिनिधी संतोष चेऊलवार 

औरंगाबाद विभाग मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काल मंगळवारी 1 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले, लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, आ.शामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ .आशाताई शिदे यांनी मतदारसंघातील लोहा ,कंधार उस्मान नगर , सोनखेड ,कापसी बु, कलंबर, येथील पदवीधर मतदान केंद्राला प्रत्यक्ष भेटी देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून मतदानाचा आढावा घेतला. यावेळी भास्करराव पाटील जोमेगावकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजी वैजाळे, कृ. उ. बा. समितीचे सभापती ज्ञानेश्‍वर पा.चौडे , श्याम अण्णा पवार, मोहम्मद बबरसाहब,नगरसेवक जीवन चव्हाण ,राजू पाटील वडवळे ,गोविंदराव पाटील चिंचोलीकर उपस्थित होते. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस ,शिवसेना महा विकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी लोहा, कंधार मतदार संघातील पदवीधर मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन उमेदवार सतीश चव्हाण यांना प्रथम पसंतीचे मतदान करण्याचे नम्र आवाहन आ. शामसुंदर शिंदे व सौ. आशाताई शिंदे यांनी केले होते, मतदान प्रक्रियेच्या दिवशी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी लोहा, कंधार मतदार संघातील पदवीधर मतदान केंद्राला प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली व मतदानाचा आढावा घेतला, यावेळी माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार ,शेरू भाई, बंटी गादेकर, नगरसेवक पंचशील कांबळे, काँग्रेस शहर अध्यक्ष वसंत (बापू )पवार, सतीश कराळे, दत्ता घोरबांड, कैलास मेहर ,अनिकेत पाटील जोमेगावकर,श्याम सावळे,संतोष वडवळे, अशोक सोनकांबळे, सोनू देशमुख ,अशोक पाटील कळकेकर ,आदीसह लोहा, कंधार मतदार संघातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.