आगामी काळात नामदार संजय बनसोडे  उदगीर मतदार संघाला आदर्श विकास मॉडेल बनविणार - शफी हाशमी

आगामी काळात नामदार संजय बनसोडे  उदगीर मतदार संघाला आदर्श विकास मॉडेल बनविणार - शफी हाशमी



उदगीर [प्रतिनिधी ] उदगीर विधान सभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. संजयजी बनसोडे साहेब उदगीर विधान सभा मतदार संघाला आगामी काळात आदर्श


विकासाचे रोल मॉडेल बनविणार असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते शफी हाशमी यांनी गुडसूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग उदगीरच्या वतीने आयोजित केलेल्या एका बैठकीत केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय विभागाचे उदगीर तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मौलाभाई शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रशांत मोरे, उदगीर शहराध्यक्ष प्रेम तोगरे, सुलतान खान, दस्तगिर शेख आदी उपस्थित होते. 


                  अध्यक्षीय समारोप करताना प्रदीप जोंधळे म्हणाले की, नामदार संजयजी बनसोडे साहेबांच्या रूपाने उदगीर विधानसभा मतदार संघाला एक वैचारिक, तळागाळातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले, विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व मिळाले आहे. महाराष्ट्र राज्याचे जाणते राजे आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या स्वप्नातील आदर्शवत विकास मॉडेल बनविण्याची क्षमता ना.बनसोडे साहेबांकडे आहे. नामदार संजयजी बनसोडे साहेबांनी मागील दहा वर्षांपासून मागणी असलेले पण प्रलंबित असलेले साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृहासाठी 25 लक्ष रूपयांचा निधी मंजूर केला आहे. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा समाजाच्या वतीने अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. गुडसूर येथील बौद्ध व मातंग समाजाच्या स्मशानभूमीच्या संरक्षणभिंतीकरिता निधी उपलब्ध करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ना. संजयजी बनसोडे साहेबांकडे पाठपुरावा केले जाईल. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून विकासापासून उपेक्षित असलेला मागासवर्गीय समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नामदार संजयजी बनसोडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बसवराजजी पाटील नागराळकर साहेब, उदगीर पंचायत समितीचे सभापती प्रा शिवाजीराव मुळे सर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर यांच्या विकासात्मक व वैचारिक मार्गदर्शनाखाली कार्य केले जात आहे. गुडसूर येथील मागासवर्गीय समाजाचे मुलभूत प्रश्न व संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेकरिता लागणारे २१ हजारांचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्रासाठीचा प्रश्न पक्षश्रेष्ठींच्या सहकार्याने सोडविले जातील, असे अभिवचन देण्यात आले.


       या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मौलाभाई शेख, प्रशांत मोरे यांची बैठकीस समयोचित मार्गदर्शन केले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे उदगीर तालुका सरचिटणीस किरण सूर्यवंशी, अनिल सूर्यवंशी, अक्षय रंजीरे, मुकेश सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. या बैठकीस गुडसूर येथील युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.