उदगीर येथे रेल्वे स्थानकावर मालधक्का उभारणीसाठी मंजुरी

उदगीर येथे रेल्वे स्थानकावर मालधक्का उभारणीसाठी मंजुरी


उदगीर : येथील रेल्वे स्थानकावर मालधक्का व शेड उभारणीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे उदगीर येथून धान्य दळणवळणसाठी सुलभता होणार आहे. या मंजुरीसाठी उदगीर रेल्वे संघर्ष समितीने सातत्याने पाठपुरावा केला होता.उदगीर रेल्वे स्थानकावर निजाम काळात मालधक्का व रेल्वे गोडाऊन सुविधा उपलब्ध होती. कालांतराने ती नामशेष झाली. सीमावर्ती भागाशी जोडलेल्या उदगीरची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असून मोठ्या प्रमाणात शेतमाल खरेदी विक्री होते. विशेषतः सोयाबीन व तूर या धान्याची मोठी उलाढाल असते. गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी वर्गाने व उदगीर रेल्वे संघर्ष समितीने मालधक्का उभारण्यासाठी मागणी केली होती. उदगीर रेलवे स्थानकावर यासाठी मुबलक जागाही उपलब्ध आहे.11 नोव्हेंबर 2019 साली दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री गजानन मल्या उदगीर येथे आले असता व्यापारी,लोकप्रतिनिधी व रेल्वे संघर्ष समीतीने त्यांची भेट घेऊन ही मागणी केली होती.दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन ही मंजुरी दिली असून जॉईंट इनसपेक्षन करण्यात आले आहे. 2014 - 15 साली उदगीर येथून 5 कोटी रुपयांच्या मालाचे दळणवळणही करण्यात आले होते. या निर्णयाचे स्वागत व्यापारी सागर महाजन, कैलास पाटील, बाळकृष्ण मुक्कावार, कैलास पाटील बाजार समितीचे सभापती मुन्ना उर्फ सिद्धेश्वर पाटील, आदींनी केले आहे. या मागणीसाठी उदगीर रेल्वे संघर्ष समितीचे रमेश अंबरखाने, मोतीलाल डोईजोडे, उमाकांत वडजे, विजय पारसेवार, श्रीपाद सिमंतकर आदींनी पुढाकार घेतला. 


प्रतिक्रिया।   


१) *शेतमालाला राष्ट्रीय बाजारपेठ मिळणार* माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शेतमाल दळण वळण धोरण अंतर्गत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. उदगीर येथील मालधक्का मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे मी पाठपुरावा केला होता. त्यानुसार ही मंजुरी मिळाली असून उदगीर व परिसरातील व्यापाऱ्यांना दळणवळणच्या दृष्टीने याचा लाभ होणार आहे. *खासदार सुधाकर शृंगारे*    


 


बीओटी तत्वावर शीतगृह व व्यापारी संकुल उभारणीची मागणी* उदगीर येथे मंजूर झालेल्या मालधक्का निर्णयाचे उदगीरच्या व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे. या स्थानकावर मुबलक जागा उपलब्ध आहे. रेल्वे प्रशासनाने बीओटी तत्वावर शीतगृह व व्यापारी संकुल उभारण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी केली आहे