देवस्थान प्रश्नी महसूल मंत्रालयात बैठक
भगूर:-नाशिक तालुक्यातील विहतगाव, बेलदगावं, व मनोली या 3 गावातील 10 ते 15 हजार शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवरील सात बारा उताऱ्यावर देवस्थान चे असलेले नावे व इनाम 3 चा शेरा कमी करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे अध्यक्षतेखाली 1 डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता महसूलमंत्री दालन,मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आ.सरोज अहिरे यांनी दिली
व्यापारी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते निवृत्ती अरिंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा जेस्ट नेते खा शरदचंद्र पवार यांचे कडे याबाबद कॅफियत मांडताना नमूद केले आहे की भूमि अभिलेख, पुणे विभाग व जमा बंदी आयुक्त यांचे एलाआर/७०३,दि २७.४.१९३६ चे परिपत्रका नुसार महाराष्ट्र शासनाचे महसूल व वनविभागाने ३०.११.१९७२ च्या काढलेल्या परिपत्रकाचा नाशिक चे तत्कालीन जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी चुकीचा अर्थ काडून कोणत्याही शेतकऱ्यास नोटीस अथवा दवंडी न देता नोंदी केल्या,वास्तवीक ब्रिटिश सरकारने व तद्नंतर भारत सरकारने देखील शेतकरी वर्गास न्याय देण्याची भूमिका घेतली असता १९७२मध्ये साशकीय अधिकारी यांनी काढलेले परिपत्रक शेतकरी वर्गाचे मानगुटीवर बसले आहे,तहसीलदार यांनी शेतकरी यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या सात बारा उताऱ्यावरील रेघेच्या वरती देवस्थान तर रेघेच्या खाली शेतकरी यांचे नावे घातली यामुळे हा घोळ झाला आहे,या शिवाय देवस्थानच्या दिवाबत्ती साठी महसूल मिळणे कामी हे प्रयोजन असताना गेल्या ४७ वर्षात देवस्थान कडून महसूल विभागाकडे अशी मागणी देखील केलेली नाही,याउलट शेतकरी यांना स्वतःच्या मालकीच्या जमिनीचा विकास करणे अथवा विक्री करणे या साठी देवस्थान चा ना हरकत दाखला घेताना कायद्यात कोठलीही तरतूद नसताना लाखो रुपयांची लूट केली जाते,यासाठी देवस्थान व ईनाम वर्ग ३ चा शेरा कमी करून सात बारा उतारे दुरुस्ती होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे, याबाबद शरद पवार यांनी महसूलमंत्री यांना बैठक घेणे बाबद सूचित केले होते, त्यानुसार १डिसेंबर रोजी मत्रालय येथे बैठक होत आहे, ता बाबद महसूल व वनविभागाचे अवर सचिव हेमंत डांगे यांनी २६ नोव्हेंबर ला आदेश काडून बैठक बोलाविली आहे,त्यास आमदार सरोज अहिरे, महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी नाशिक, निवृत्ती अरिंगळे तसेच संबंधित अधिकारी यांना निमंत्रित केले आहे