खुल्या व्हाँलीबाँल स्पर्धाचे राज्यमंत्री संजय बनसोडे याच्या हस्ते उद्घाटन

 खुल्या व्हाँलीबाँल स्पर्धाचे राज्यमंत्री संजय बनसोडे याच्या हस्ते उद्घाटन





उदगीर :शेरे ए हिंन्द टिपु सुलतान र.अ जयंती निमित्त भव्य खुल्या व्हाँलिबाँल आयोजन मौजे वाढवणा ता.उदगीर येथे करण्यात आले आहे दरवर्षी या स्पर्धा चे नियोजन हजरत टिपु सुलतान र. अ कमिटी वाढवणा ही करीत असते या स्पर्धा चे उद्घाटन राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती कल्याण पाटील, संगम आष्टुरे,शेख अय्याज,शाम डावळे,माधव कांबळे ,बबन भांगे दत्ता बामणे,तसेच अनेक संघाचे खेळाडू उपस्थित होते.

वाढवणा या गावातून अनेक गुणवंत खेळाडू निर्माण झाले आहेत अशा खेळातून खेळाडू वृत्ती तयार होती यश अपयश पचविण्याची ताकत निर्माण होते निरोगी समाजासाठी निरोगी मन,तन आवश्यक असते ते अशा स्पर्धेतुन निर्माण होते असे मत राज्याचे पाणी पुरवठा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले