महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या लोहा तालुकाध्यक्षपदी मोहन व्यंकटराव पाटील पवार यांची निवड 




लोहा (प्रतिनिधी संतोष चेऊलवार) 

लोहा 

मोहन पवार यांनी गेल्या दोन वर्षांपासून संघटनेसाठी शहर व ग्रामीण भागातील जनतेसाठी व शेतकर्‍यांसाठी पत्रकारांसाठी विविध उपक्रम व समाजउपयोगी कार्य करुन सर्वाच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला तसेच संघटनेसाठी व सर्वासाठी समाजउपयोगी कार्य केले. 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे त्यांना परत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली 

त्यांच्या निवडीपत्र जिल्हाध्यक्ष रमेश पांडे, जिल्हा सरचिटणीस रूपेश प्रमुख, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानोबा पवार यांनी दिले

मोहन पवार यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संतोष चेऊलवार, सर्व पत्रकार बंधु कडून अभिनंदन केल्या गेले