नगरसेवक भगवान कटारिया यांच्या संपर्क कार्यलयत येऊन मारहाण करून शिवीगाळ
भगूर :- आपल्याला नोकरीस लावत नसल्याचा राग मनात धरून अस्लम सईद सैय्यद (वय ४२ ) याने देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक भगवान कटारिया यांच्या संपर्क कार्यलयत व नोवेल्टी स्टोअर्स येथे येऊन मारहाण करून शिवीगाळ व दुकानातील साहित्याची तोडफोड केली या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथील वॉर्ड क्रं.३ चे नगरसेवक भगवान कटारिया यांचे याच परिसरात संपर्क कार्यलय व नोव्हेंटि स्टोअर्स व जुन्या बस स्थानक परिसरात राहणाऱ्या अस्लम सईद सैय्यद (वय ४२ ) याने आपल्याला कॅन्टोन्मेंटमध्ये तात्पुरत्या स्वसरूपात नोकरीला लावत का नाही असा प्रश्न विचारला त्यावर कटारिया यांनी लोकडाऊनमुळे नोकरी नसल्याचे समजावून सांगितले मात्र तरीही त्याने कटारिया यांच्या दुकानातील साहित्याची तोडफोड करत शिवीगाळ व कटारिया यांना मारहाण करत तुझ्याकडे पाहुन घेईल अशी धमकीही दिली. त्यानंतर नगरसेवक भगवान कटारिया यांनी या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात भादंवि कलाम ३२३,५०४,५०६,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.