शिवाजी महाविद्यालयात संविधान दिन साजरा
उदगीर --शिवाजी महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .विनायकराव जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी कार्यक्रमाला रेल्वे बोर्डाच्या सदस्या सौ.मीनाक्षीताई पाटील शिरोळकर या उपस्थित होत्या. महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन प्रा.डा.एस.एम. कोनाळे यांनी केले. त्यांच्यासोबत महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामुहिक वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. कदम एन.ए. यांनी तर आभार प्रा.डॉ. एस.एम.कोनाळे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील कार्यालयीन कर्मचारी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.