दै आत्ताच एक्स्प्रेस चे संपादक सुग्रिव मुंडे यांचा नांदेड येथे सत्कार
लोहा प्रतिनिधी संतोष चेऊलवार
दैनिक आत्ताच एक्सप्रेस चे मुख्यसंपादक श्री सुग्रिव मुंडे हे नांदेड येथे आले आसता नांदेड जिल्हा व तालुक्यांच्या प्रतिनीधीनी होटल नागार्जुन येथे त्यांचे आदरतिथ्य करुन स्वागत करण्यात आले .
त्या वेळी संवाद साधतांना ते म्हणाले मिडीया मधे सध्याच्या युगामधे आत्यंत स्पर्धा लागली असुन पत्रकारांनी वैचारीक व आभ्यास पूर्ण लिखाण करणे गरजेचे आहे .विवीध क्षेत्रा मधील अनेक गोष्टी जनसामांन्या पर्यंत जशास तश्या पोहचत नसुन कधी कधी वाचकांमधे संभ्रम निर्माण होत आसतो म्हणुण बातमी लिखान करणाऱ्यानी स्वत सत्यता पडताळुनच पुराव्यानिशी बातमी लिहील्यास वाचकांना त्याचा फायदा होईल असे सांगुन दै आत्ताच एक्स्प्रेस , व साप्ताहिक नौकरी एक्स्प्रेस , या बाबत सर्वाना सुचना व मार्गदर्शन करुन दै आत्ताच एक्सप्रेसचे नुतन जिल्हा प्रतिनीधी राजेश चंद्रकर ( चंद्रे ) यांना पुढील कार्यभार सोपवून त्यांना शुभेच्छा दिल्या या वेळी निवासी संपादक सौ सुमनताई पोलशेटवार , सुनीता कोल्हेकर, पुष्पाताई ढगे , गंगाप्रसाद सोनकांबळे धर्माबाद , मो. हकीम शेख लोहा, संदीप हाणवते हादगाव, सर्व प्रतिनीधी उपस्थीत होते तर आभार नांदेड शहर प्रतिनिधी बालाजी आंबोरे यांनी मानले .