तामसा येथील ग्रामविकास अधिकारी यासह सरपंच व सदस्यावर तामसा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल......
हदगाव ( तालुका प्रतिनिधि)
भूखंड विक्री प्रकरण
@ न्यायलयीन प्रकरण असताना केला भूखंड विक्री
@ अवैध बांधकामाची मालिका सुरुच
हादगाव तालुक्यातील तामसा येथील अठवड़ी बाजार च्या जागेचा वाद न्याय प्रविष्ठ असून ग्रामविकास अधिकारी व सरपंचासह काही ग्रामपंचायत सदस्य यांनी पदाचा दुरुपयोग करून बोगस कागद पत्रे तयार करून भूखंड विक्री केल्याची तक्रार येथील तक्रारदार मुकरब खाँ महमूद अली खा पठाण यांनी तामसा पोलिसांना दिलेल्यावरुन त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे
तामसा ही सर्वात मोठी बाजार पेठ असून या ठिकाणी जूना बस्थानक च्या बाजूस दर शनिवारी बाजार भरत असतो तेव्हा दिवंगत अली खाँ पठाण उर्फ बाबू खाँ साब पठाण हे नावजलेले व्यक्ति होते त्यांच्या निधना नंतर त्यांचे वारसदार मुकरब खाँ अली खाँ पठाण यांनी तामसा ग्रामपंचायतने जागा ताब्यात घेतल्या मुळे त्यांच्या विरुद्ध कोर्टात याचिका दाखल केली होती व हदगाव उपविभागीय अधिकारी या ठिकाणी अपील या जमीनी विषयी आपली दाखल केली होती
ही सुनावनी बाकी असताना व हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असताना तामसा ग्राम पंचायतचे ग्रामविकास अधिकारी व,सरपंच, तसेच काही सदस्य यांनी खोटे नमूना न 8 देऊन फसवणूक केल्या प्रकरणी तामसा ग्राम पंचायतचे ग्रामविकास अधिकारी सरपंच,काही ग्राम पंचायत सदस्य यांच्या विरोधात मुकरब खाँ अली खाँ पठाण यांच्या फिर्यादि वरुण तामसा पोलिसात गुन्हा दि 24 ऑटोम्बर रोजी दाखल करण्यात आला.आहे
या ठिकाणी वास्तविक पाहता सर्व्हे न.मध्ये ग्रामपंचायतला दखल देण्याचा कोणतेही अधिकार नाहीत परंतु आर्थिक मोहा पुढे येथील भृष्ट ग्रामविकास अधिकारी यांनी चक्क ग्राममपयत च्या
जागेत सार्वजनिक शौचालय साठी मंजूरी असताना ती जागा ग्रामविकास अधिकारी यांनी आर्थिक मोहा पुढे विक्री केल्याचे ही फिर्यादिने संगीतले
फिर्यादि मुकरब खाँ पठान यांनी सर्व्हे न.1(ब) मधील 4 एकर जमीनी साठी सन 2016 पासून वारसा हक्क प्रमाणे अपील दाखल केली होती त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालय हदगाव यांच्याकडे अपील असून त्या जमिनिचा वाद न्याय प्रविष्ठ आहे ही येथील भृष्ट ग्राम सेवक यांनी सरपंच,काही ग्राम पंचायत सदस्य याना हताशी धरून स्वता च्या फ़ायद्या साठी आर्थिक तड़जोड करून विक्री केली तसेच नमूना न 8 ला अठवड़ी बाजार ग्राम पंचायत तामसा या नावाने आहे आणि त्या प्रकारचा नमूना न 8 ही सदयाचे ग्राम सेवक यांनी स्वक्षरी सहित दिला आहे तेव्हा ही जमीन बकायदे शिर लावल्याची तक्रार फिर्यादि मुकरब खाँ पठाण यानी दिली फिर्यादि वरुण आरोपी विरुद्ध तामसा पोलीसात भादवी प्रमाणे कलम 120(ब),420,471,467,468,504, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तामसा पोलीस ठाणे येथील सपोनि नामदेव मद्दे यांच्याशी आरोपी विषयी संपर्क केला असता सदरिल ग्राम पंचायत सरपंच,ग्रामसेवक याना पुरावे सादर करण्याची नोटिस दिली असून अद्यपही ग्राम पंचायत ने पुरावे दिले नाहीत या ठिकाणी ग्राम पंचायत कोणत्या ही नोटिस चे उत्तर देत नाही तेव्हा आम्हास पुढील कार्यवाही करावी लागेल असे संगीतले यातील उल्लेखनीय बाब म्हणजे तामसा ग्रामपंचायतीच्या सरपंच ग्रामविकास अधिकाऱ्यावर पोलीस कारवाई झाल्यावरही तामसा शहरातील अनधिकृत बांधकाम चालूच आहेत त्यामुळे तामसा येथील चालू असलेल्या भूखंडाचे बांधकाम करणाऱ्यावर एखाद्या कोण्या राजकीय व्यक्तीचा पाठिंबा आहे की काय असा प्रश्न तामसा शहरातील नागरिकांना पडला आहे