दोन दिवसीय कौशल्य आधारित शेतकरी शेतमजूर प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता.

दोन दिवसीय कौशल्य आधारित शेतकरी शेतमजूर प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता.



देवणी प्रतिनिधी 


"शेतकऱ्यांनी हवामान आधारित शेतीवर भर द्यावा" पंजाबराव डक- प्रसिद्ध हवामान तज्ञ.


प्रकल्प संचालक कार्यालय आत्मा लातूर तथा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा तालुका कृषी कार्यालय देवणी यांच्या विद्यमाने मौजे गोंडगाव तालुका देवनी येथे दोन दिवसीय शेतकरी शेतमजूर प्रशिक्षण कार्यक्रमाचा सांगता झाली. प्रकल्प संचालक आत्मा श्री दत्तात्रेय गावसाने आणि तालुका कृषी अधिकारी शिरीष कुमार घनबहादूर यांच्या नियोजनाने मौजे गौडगाव येथे दि. 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी शेतकरी प्रशिक्षण वर्गाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी पहिल्या दिवशी तुळजापूर येथील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ जाधव ऐ.एन.यांनी सेंद्रिय भाजीपाला लागवड त्यांची जोपासना, काढणी,तोडणी,आणि विक्री व्यवस्थापन याबाबत सखोल मार्गदर्शन केले पुढील काळ हा सेंद्रिय शेतीचा असून शेतकऱ्यांनी सेंद्रिय भाजीपाला निर्मितीमध्ये उतरून ब्रँड निर्माण करावा आणि भरघोस उत्पन्न मिळावे असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच आत्म्याचे प्रकल्प उपसंचालक श्री अशोक किरवले यांनी शेतकऱ्यांनी शासनाच्या कोणत्याही योजनेकडे अनुदाना पुरते मर्यादित न पाहता योजना चांगल्या प्रकारे राबवून गावांमध्ये त्या योजनेचा यशस्वी पॅटर्न निर्माण करून संपूर्ण गावचा आणि परिसराचा प्रामुख्याने शेतकऱ्यांचा विकास साधून घ्यावा व तसेच शेतकऱ्यांनी गट शेती आणि शेतकरी उत्पादक कंपनी निर्माण करून मार्केटिंग मध्ये उतरावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या दुसर्‍या दिवशी प्रसिद्ध हवामान तज्ञ श्री पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांनी आता हवामानाधारित शेतीवर भर देऊन उत्पन्न वाढीकडे लक्ष घालावे असे सांगितले त्याचबरोबर पर्जन्यमान, हवामान, गारपीट, दुष्काळ,वादळी वारे इत्यादीबाबत शेतकऱ्यांना पुढील वर्षाचे भाकीत केले.हवामान आणि पर्जन्यमान या दोन गोष्टीचा मेळ घालून शेतकऱ्यांनी शेती करावी आणि आपले उत्पन्न वाढवावे असे प्रतिपादन त्यांनी केले .प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी श्री तिर्थकर साहेब साहेब यांनी शेतकऱ्यांनी सेंद्रिय भाजीपाला निर्माण करून लातूर आणि उदगीर येथील व्यापारी तसेच अति उच्चभ्रू वर्गामध्ये त्याची मार्केटिंग करून उत्पन्न वाढवावे आणि तसेच कीटकनाशक फवारणी करतेवेळी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले चाकूर तालुक्यातील मधुमक्षिका पालन तज्ञ श्री दिनकरराव पाटील यांनी पारंपरिक शेतीवर भर न देता पूरक व्यवसायाकडे वळावे आणि मधुमक्षिका पालन सुरुवात करून मध विक्री च्या माध्यमातून अर्थार्जन करावे मधुमक्षिका पालन बाबत श्री दिनकर पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री शिरीष कुमार धनबहादुर यांनी तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री राहुल जाधव यांनी गट शेती शेतकरी उत्पादक कंपनी पूरक व्यवसाय दुग्ध व्यवसाय पशुपालन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले सदरील दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी गौंडगाव प्रगतशील पुरस्कार प्राप्त शेतकरी राजकुमार बिरादार, ओंकार मस्‍कले, राजपाल बिरादार, मंडळ कृषी अधिकारी बी एस पाटील, कृषी सहाय्यक सुजाता बनशेळकीकर, श्रीमती माया श्रीनामे ,जाधव बी एम आणि परिसरातील महिला पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.