चंदरअण्णा प्रतिष्ठाणच्या वतीने नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थाचा सत्कार संपन्न
नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थांनी उदगीरचे नाव महाराष्ट्रात उंचावले- जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे
उदगीर -केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल लागला असून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी प्राविण्य मिळविण्याचा मान उदगीरच्या सुपुत्रांनी पटकावला आहे. यामध्ये अभय अशोक चिल्लरगे या विद्यार्थ्यiने ७२० पैकी ७०५ गुण प्राप्त करून राज्यात दुसरा क्रमांक मिळविला तर अंकिता संजय सोळुंके हीने ५९३ व मयुरी शिवकुमार भांजीने ५६९ गुण घेतले आहेत. याच सोबत विकास नगर येथील मोमीन इरफान सलीम या विद्यार्थाने शासकीय वैद्यकीय कॉलेज औरंगाबाद येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले याचे औचित्य साधून समाजकार्यात सदैव पुढाकार घेणाऱ्या विकास नगर येथील चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने वरील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी चंद्रकांत वैजापूरे तर प्रमुख अतिथी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे हे होते. याच सोबत नगर सेवक गणेश गायकवाड, चेअरमन अभंग जाधव, बबन जाधव, विमलताई गर्जे, चंदकला बिरादार, पंडितताई हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्याचा मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व प्रतिष्ठानचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी राहुल केंद्रे गुणवंत विद्यार्थाच्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले कि या गुणवंत विद्यार्थांमुळे उदगीरचे नाव महाराष्ट्रात नव्हे तर देशात उंचावले आहे. नीट परीक्षेमुळे संपूर्ण राज्यात शिक्षण क्षेत्राचे माहेर घर म्हणून लातूर जिल्हा पॅटर्न नावाजले गेले आहे. यामध्ये चंदरअण्णा प्रतिष्ठाणने या गुणवंताचा सत्कार करून सामाजीक बांधीलकी जपली. मला या प्रतिष्ठाणचा सार्थ अभिमान असून चंद्रकांत वैजापूरे यांच्या कार्याला सलाम तर चंदर अण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांचे कौतूक करावे तितके कमी आहे असे म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन श्रीमती प्रतिभा मुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानोबा मुंडे यांनी मानले.
यावेळी प्रदीप विरकपाळे सर, ॲड सुनील रासुरे, पत्रकार महादेव घोणे,राजकुमार बिराजदार बामणीकर,महेश धनाश्री, महेश नवाडे, कुमार चौधरी, शिवशंकर पाटील, मारोती लांडगे, विठ्ठलराव मुंढे, तानाजी जाधव,कल्याण बिरादार, रमेश खंडोमलके, संतोष सुर्यवंशी, अजित फुलारी,उमाकांत सुंदाळे, हरिश्चंद्र वट्टमवार, अमोल पाटील, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक, आदी मित्र परिवार उपस्थित होते.