हाथरस प्रकरनी त्या मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमाना फाशीची शिक्षा द्या.....
वंचित बहुजन आघाडी तर्फे निषेध करून हदगावच्या तहसीलदाना दीले निवेदन .....
हदगाव तालुका प्रतिनिधी:- उत्तरप्रदेशातील हाथरस बलात्कार व खून प्रकरण म्हणजे माणुसकीला काळिमा फासनारी घटना असून या घटनेतील नराधम आरोपीनी माणुसकीच्या सर्व सीमा पार केल्या आहेत 19 वर्षीय मनीषा वाल्मिकी या निरागस पीडीतीवर अमानुष सामूहिक बलात्कार करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने अतिशय क्रूरतेने या नराधमाने पीडित मुलीची जीभ कापली आहे त्याचबरोबर पाठीचे मनके तोंडण्यात आले आहेत ही घटना म्हणजे अतिशय क्रूर व योजनाबद्ध जातीय मानसीकतेतुन करण्यात आली आहे त्यामुळे या नराधमाना सदरील प्रकरनी जलद न्यायालयात चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी सदरील प्रकरण म्हणजे उत्तरप्रदेशातील राज्य सरकार चे हात असलेले असून राज्याचा मुख्यमंत्री यांनी सत्येचा दूर उपयोग करून मागासवर्गीय समाजाविषयी जातीय व्देश बाळगून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे मुख्यमंत्री अजय बिस्ट (योगी )यांना या प्रकरनात सह आरोपी करण्याची मागणी या निवेदनद्वारे करण्यात आली आहे या प्रकरनाला संपविन्याची सुपारी घेतलेले जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व सर्वच समाविस्ट अधिकारी यांना ही या प्रकरनीसह आरोपी करावे व पीडित कुटूंबाला तात्काळ एक कोटी रुपयाची शासकीय मदत देण्यात यावी कुटूंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे तसेच सरकार तपासाचे सोग करत असून या प्रकरनातील आरोपी सिद्ध झाले आहेत त्यामुळे सदरील प्रकरणातील आरोपीना तात्काळ फासावर लटकावे अस्या प्रकारचे निवेदन हदगांव तहसीलदार द्वारे राष्ट्रपती भवन नवी दिल्ली यांना पाठवण्यात आले यावेळी डॉ. सुदर्शन भरती, सुनील बाराटे, मनोज हरने, एस. के. इगोले, प्रकाश कांबळे, संजय कांबळे आष्टीकर ,विलास भालेराव, रजित बगाटे, देवानंद पाईकराव, दीप नांदेडकर, महेंद्र धोगडे आदी वंचित बहुजन आघाडी हदगांव तालुक्यातील कार्यकर्ते हदगांव तहसीलदार यांना निवेदन देताना उपस्थित होते प्रतिनिधी अशोक गायकवाड हदगाव