तामसा येथील भुसार मार्केट मध्ये अचानक राडा झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तर एका वाहनाचे नुसकान...
पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी घडलेली घटना ....
प्रतिनिधी अशोक गायकवाड
हदगाव तालुका प्रतिनिधी :-हदगाव तालुक्यातील तामसा येथील जुने बसस्थानक परिसरात भुसार मार्केट मधील रस्त्यावर रविवारी दुपारी चारच्या दरम्यान अचानक राडा झाल्यामुळे तामसा शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्मल होऊन सर्वत्र पळापळ सुरू झाली. होती हा राडा होण्याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून शासकीय जागेवरील बांधकामावरून हा गंभीर प्रकार घडल्याची चर्चा तामसा शहरात होत आसुन तामसा शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेच्या मुद्दावरून हा वाद चिघळत असून आगामी काळातील संभाव्य गंभीर व अप्रिय घटनेची चुणूक रविवारच्या राड्यामुळे स्पष्ट झाली आहे. सार्वजनिक जागेच्या मुद्द्यावरून काहीजणांनी रस्त्याच्या कडेला उभारलेल्या दुकानांना हटविण्याचा प्रकार सुरू झाला त्यामुळे प्रचंड गोंधळ उडून जबरदस्त हाणामारीस सुरुवात झाली. यात काही वाहनांचे देखील नुकसान झाले आहे.दुकाने हटविणण्याचा प्रयत्न करणारे तामसा येथील रहिवासी नसल्याची चर्चा असून या अनोळखी व्यक्तीमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तासभर हानामारी व शाब्दिक चकमकीमुळे परिसरात पळापळ झाली. होती वातावरण चिघळण्यामुळे राड्यातील काहीजण अचानक पळ काढून गायब झाले. या प्रकरणी तामसा पोलिस ठाण्यात गेले. असता ठाणे परिसरात सर्वत्र गर्दी झाली होती. तर ना कोरोनाची भीती ना प्रशासनाचा वचक अशी येथील परिस्थिती गर्दीवरून स्पष्ट झाली होती. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणून राडा करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करणे आवश्यक आहे, चर्चा तामसा शहरातील सर्वसामान्या नागरिकातून व्यक्त होत होती. शहरातील विविध कार्यालयांच्या सार्वजनिक जागेवर होणारे मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणे हे वरचेवर गंभीर रूप घेत असून त्याला पडद्यामागून प्रोत्साहन देणारे सूत्रधार यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्धही कार्यवाही होणे आवश्यक आहे. संबंधित कार्यालयाचे मौन हे अतिक्रम फुस लावण्याचे कारण बनत असून रविवारी झालेल्या या राडयातुंन धडा घेत पोलीस प्रशासन व शासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर कडक पावले न उचलल्यास येणाऱ्या काळामध्ये तामसा शहरातील वातावरण अधिकच बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती तामसा शहरातील जनतेतून होत आहे तर या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात वृत्त लिहीपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता याशिवाय तामसा पोलिस ठाण्याच्या हाकेवर असलेल्या मार्केटमध्ये अशा काही घटना दिवसाढवळ्या घडत असतील तर तामशातील कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावरच आहे की काय असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे जेव्हा बाहेर गावावरील गुंड प्रवृत्तीचे लोक तामसा शहरात येऊन दहशत माजवतात तेव्हा पोलीस प्रशासन होते कुठे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये उपस्थित होत आहे.