शारदोत्सवानिमित्त राज ढोबळे मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

शारदोत्सवानिमित्त राज ढोबळे मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न



उदगीर [प्रतिनिधी ] सहयोगनगर उदगीर येथील युवा कार्यकर्ते राज ढोबळे मित्र मंडळाच्या वतीने शारदोत्सवानिमित्त नागप्पा अंबरखाने ब्लड बँक येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 16 रक्तदात्यांनी रक्तदान केले.     


       कोरोना सारख्या महामारीमध्ये अनेक रूग्णांना रक्ताची गरज भासत आहे. सध्या ब्लड बँकेमध्ये रक्ताची कमतरता भासत असल्यामुळे युवकांनी अशा कठीण महामारीच्या प्रसंगी रूग्णसेवा करावी या उदात्त हेतूने राज ढोबळे मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजीत केले होते. या शिबीरामध्ये राज ढोबळे, विठ्ठल कांबळे, ऋषी कापुरे, अक्षय हादवे, आनंद कांबळे, आकाश सांगवीकर, सत्यम ढोबळे, नागेश कांबळे, व्यंकटेश राजे, विकास कांबळे,करण कांबळे आदीनी रक्तदान केले.


            युवा पिढीने समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचा या उपक्रमांचे कौतुक होत आहे.