अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड वारकरी संप्रदाय आघाडीच्या मराठवाडा अध्यक्ष पदी युवा किर्तनकार ह.भ.प. स्वप्निल महाराज घोणे
तुगाव-अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड वारकरी संप्रदाय आघाडीच्या मराठवाडा अध्यक्ष पदी युवा किर्तनकार ह.भ.प. स्वप्निल महाराज घोणे मु.पो. तुगाव जि. उस्मानाबाद यांची अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष अॅड.प्रदीपसिंह गंगणे महासचिव अॅड. अमितकुमार कोतमिरे यांच्या सुचनेनुसार प्रदेश सचिव सुनिल कांबळे व विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष साईनाथ घोणे यांनी निवड केली आली आहे. मागील काळातील वारकरी संप्रदायातील कार्याची दखल घेऊन निवड करण्यात आली आहे. पुढील काळात वारकरी संप्रदाया चे विचार मराठवाड्यात वाढविण्याची जबाबदारी ह. भ. प. स्वप्निल महाराज घोणे यांच्यावर असणार आहे. निवड झाल्या बद्दल वारकरी सांप्रदायातून निवडीचे स्वागत होत आहे.