श्री राजेश्वर निटूरे सावकार यांची प्रकृती बरी व्हावी यासाठी चिखली (यू) गावच्या ग्रामस्थांचे हनुमान मंदिरात साकडे
चिखली यू / प्रतिनिधी सीमाभागातील चिखली यु ता कमलनगर या गावचे सुपुत्र व उदगीरचे लोकनेते काॅग्रस पक्षाचे धुरंधर नेते माजी नगराध्यक्ष श्री राजेश्वर निटूरे सावकार यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रकृती बरी व्हावी यासाठी दि 10आक्टोबर 2020रोजी सकाळी 7:00 वाजता हनुमान मंदिरात अभिषेक आरती केले.राजेश्वर निटूरे लवकरात लवकर बरे व्हावे व जनतेच्या सेवेत यावे या साठी साकडे घातले.
श्री राजेश्वर निटूरे सावकार यानी अहोरात्र जनतेच्या सेवेत असतात. अनेक गोरगरीब जनतेने धान्याचे कीट वाटप केले.असेच समाजोपयोगी कार्य चालू असताना कोरोनाची लागण झाली. श्री राजेश्वर निटूरे सावकार सावकार याना तात्काळ हैद्राबाद येथे उपचार घेण्यासाठी अॅडमिड केले.अनेकानी सावकाराची तब्येत चागली होण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करीत आहेत चांगले होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत येण्यासाठी साकडे घालत आहेत. उदगीर तालुक्यातील व सीमाभागातील जनतेच्या मनात भिती निर्माण झाली होती. व सावकारची तब्येत चागली व्हावी म्हणून प्रार्थना करीत आहेत राजेश्वर निटूरे याचे गाव चिखली यू ता कमलनगर आहे गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन ग्राम पंचायत चिखली चे अध्यक्ष (सरपंच) तथा औराद काॅग्रस पक्षाचे अध्यक्ष श्री आनंद चव्हाण यानी या कार्यक्रमाचे आयोजन केले.यावेळी गावातील बस्वराज निटूरे शालुल पठण सोपानराव सोमवंशी श्रीमंत चव्हाण, महादप्पा स्वामी, संजय मुर्की बालाजी हारडगे, मेहबूब पठाण,डी जी चव्हाण,अमीर पठाण, अहमद हुसेन, बाळू चव्हाण, राजेश चव्हाण व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी आनंद चव्हाण यानी मनोगत व्यक्त केले