हदगावच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दैनिक लोकजागृतीच्या पत्रकारावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यामुळे तहसीलदारा मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकारांनी निवेदन देऊन केला जाहीर निषेध......

प्रतिनिधी अशोक गायकवाड
हदगाव - महाराष्ट्र पत्रकार संघाचे हदगाव तालुका अध्यक्ष तथा दैनिक लोकजागृती या वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी अशोक गायकवाड यांनी दि.11/10/2020 रोजी हदगाव च्या पंचायत समितीला सक्षम गटविकास अधिकारी मिळेल का अशी बातमी दैनिक लोकजागृती या वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित केली होती या कारणावरून गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या कर्मचारी मार्फत पत्रकारांना बोलावून कर्मचारी व पत्रकार अशोक गायकवाड मिळून गेले असता गटविकास अधिकारी म्हणाले की कोण गायकवाड पत्रकार आहे मी त्याला ओळखत नाही त्याने माझ्या विरोधात बातमी लावली तर माझे काय झाले अशा कितीही बातम्या लावल्या तरी माझे काहीच होत नाही पत्रकार हे पैसे घेऊन बातम्या लावतात तसेच तुमच्यासारखे पत्रकार हे दगडाखाली आहेत असे म्हणत तुझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करतो म्हणून दि.13/10/2020 रोजी धमकी दिल्यामुळे आज दिनांक दि.14/10/2020रोजी महाराष्ट्र पत्रकार संघटनेची बैठक घेऊन तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जाहीर निषेध करुण गटविकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे
तहसीलदार मार्फत दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की पत्रकाराची मानहानी व बदनामी करून खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हदगावच्या गटविकास अधिकाऱ्यांनी केल्यामुळे अशा मुजोर वृत्तीच्या गटविकास अधिकाऱ्याचा महाराष्ट्र पत्रकार संघ हदगाव च्या वतीने जाहीर निषेध करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई करून पत्रकारांना न्याय द्यावा व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी असे हे निवेदन महाराष्ट्र पत्रकार संघ हदगाव तालुकाच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे या निवेदनावर महाराष्ट्र पत्रकार संघ हदगाव तालुका अध्यक्ष अशोक गायकवाड , सचिव विकास राठोड, उपाध्यक्ष राजेश मामीडवार, कैलास तलवारे, के डी पवार, गोलू पवार, संतोष सुरोशे शुभम तुपकरी संदीप वानखेडे राजू हापसे यांच्यासह अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते