चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योध्दा महेश नवाडे
याचा सत्कार संपन्न
उदगीर: विकास नगर उदगीर येथील रहिवाशी महेश नवाडे हे सामान्य रुग्णालय उदगीर येथेआरोग्य विभागाचे औषध निर्माता अधिकारी असून यांनी कोवीड19 काळात मोलाची कामगिरी बजावली आहे याची दखल घेऊन त्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय लातूरच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
करिता आज चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने श्रीकांत पाटील यांच्या हस्ते महेश नवाडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी रमेश खंडोमलके, संतोष सुर्यवंशी,कल्याण बिरादार,ज्ञानोबा मुंढे, हरिश्चंद्र वट्टमवार,अनिल बालूरे, गणेश बिरादार, महादेव घोणे, तानाजी जाधव, शिवाजीराव पाटील,गिरीधारी राजपुरोहित,भागवत बिरादार आदी मित्रपरिवार उपस्थित होते.