तामशाच्या काही ग्रा .पं .सदस्या च्या फायद्यासाठी ग्रामविकास अधिकारी शेळके हे ग्रामपंचायतला पुन्हा रुजू.....

तामशाच्या काही ग्रा .पं .सदस्या च्या फायद्यासाठी ग्रामविकास अधिकारी शेळके हे ग्रामपंचायतला पुन्हा रुजू.....



हदगाव तालुका प्रतिनिधी:-मागील अनेक दिवसापासून तामसा येथील ग्रामपंचायत हे विविध विषयाच्या चर्चेने सध्या सर्वत्र गाजत असून याच बरोबर पाच वर्षाच्या कार्यकाळात तामसा ग्रामपंचायतला किमान आठ ग्राम विकास अधिकारी बदलून बदलून गेले अन्न आले त्यामुळे तामसा ग्रामपंचायत बदल हदगाव तालुक्यात वेगळीच चर्चा ऐकावयास मिळत आहे तर येथील ग्राम विकास अधिकारी आनंद शेळके हे काही दिवसापूर्वी आजारी असल्याने ते तामसा ग्रामपंचायतला काही दिवस कार्य नव्हते त्यामुळे त्यांच्या ठिकाणी बी एस हाके या ग्रामविकास अधिकाऱ्याची या ठिकाणी बदली करण्यात आली होती त्यानुसार हके हे तामसा ग्रामपंचायतला


कार्यरत असतानाच त्यांची चार ते पाच दिवसात येथून बदली करण्यात आली पण हक्के यांची बदली करण्याचे नेमके काय कारण याचे गोडबागल अद्यापही तामसा वासियांना समजनासे झाले असुन विकास कामे करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी यांची चार ते पाच दिवसातच बदली होते या मागचे राजकीय षड्यंत्र काय आहे असा प्रश्न तामसा वासियांना पडला असला तरी तामशाच्या काही ग्रा.प. सदस्याच्या फायद्यासाठी ग्रामविकास अधिकारी शेळके हे तामसा ग्रामपंचायत पुन्हा रुजू अशी आगळीवेगळी चर्चा नागरिकाच्या तोंडातून ऐकावयास मिळत आहे 


तसेच तामसा येथील उपसरपंच, हदगाव पंचायत समितीचे उपसभापती व इतर सात ग्रामपंचायत सदस्यच्या शिष्टमंडळाने हदगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना भेटून तामसा येथील ग्रामविकास अधिकारी आनंद शेळके हे हटवा म्हणून काही दिवसांपूर्वीच गेले होते व अशा प्रकारची लेखी तक्रार देखील दिली असल्याचे समजते त्याशिवाय हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार यांनी देखील संबंधित अधिकारी यांना दूरध्वनीवरून बोलून आनंद शेळके यांचा चार्ज तात्काळ काढा असा आदेश दिला असल्याचे सांगण्यात येते अशा सर्व काही नाट्यमय घडामोडीनंतर बी. एस. हाके, यांना तामसा ग्रामपंचायतचा चार्ज देण्यात आला त्या नंतर मासिक मीटिंग ची तयारी करण्यात येत होती तेवढ्यात उपसरपंच यांनी काही ग्रा.प. सदस्यांना आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले याच वेळात त्यांच्या मनात शंकेची पाल सिरली अन्न हक्के नको तर शेळके ग्रामविकास अधिकारी पाहिजे म्हणत एकच नारा काही सदस्यांनी उपसरपंचापुढे धरला अन हाके यांची चार-पाच दिवसातच तामसा येथुन बदली केली पण ह्या बदलीचे नेमके कारण काय आहे हे मात्र अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी आनंद शेळके यांची बदली करणारे हेच आणि पुन्हा त्यांना तामशात रुजू करा म्हणणारे हेच त्यामुळे तामसा ग्रामपंचायत मध्ये काय गोंधळ चालू आहे याबद्दल नागरिकांमध्ये वेगळेच वातावरण निर्माण होत आहे तर तामसा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी कधीतरी आपल्या वार्डा


 मधील समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे प्रयत्न केले का आज घडीला प्रत्येक वार्डामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्याच बरोबर रस्त्यावर सांडपाणी येऊन चिखलाचे साम्राज्य निर्माण होतं असल्याचे दिसून येत असले तरी देखील याकडे फारसे लक्ष न देता आपल्या फायद्यासाठी कोणता ग्रामविकास अधिकारी चांगला राहील याकडे विशेष लक्ष देऊन पुन्हा त्याच ग्रामविकास अधिकाऱ्याला तामसा ग्रामपंचायतमध्ये आणण्यासाठी ग्रा.प. सदस्यांनी का घाई केली याबद्दल देखील नागरिकांमध्ये शंका निर्माण होत आहे