निकृष्ट दर्जाचे काम करनार्‍यांवर कारवाई करन्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश.

निकृष्ट दर्जाचे काम करनार्‍यांवर कारवाई करन्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश.



:-देवणी शहरामध्ये नगरविकास निधी अंतर्गत करन्यात आलेली दोन रस्ता व नाली कामे निकृष्ट दर्जाची झाली असुन संबंधीत कामाची योग्य ती पारदर्शक चौकशी करुन ठेकेदारावर कारवाई करन्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी लातूर यांनी देवणी नगरपंचायत मुख्याधिकार्‍यांना दिले आहेत.


रासपाचे देवणी शहराध्यक्ष बिरू कल्याणकर यांनी काही दिवसांपुर्वी शहरातील बसस्थानक ते एम.एस.बी. रोड व बोरोळ चौक ते महाराष्ट्र ग्रामीण बॅक या दोन रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असुन काम ईस्टीमेट प्रमाणे न झाल्याने दोन महिन्यातच रस्ता व नालीचे खराब झाले आहेत तरी संबंधीत रस्ता कामाचे देयक ठेकेदारास अदा करन्यात येऊ नयेत व संबंधीत ठेकेदारावर योग्य ती कारवाई करन्यात यावी अन्यथा उपोषणास बसन्याचा ईशारा जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदनाद्वारे दिला होता.या निवेदनाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी लातुर यांनी सदरील कामाचे क्वालीटी चेकिंग रिपोर्ट प्राप्त मागवुन घेतले होते ते प्राप्त झाले असता सदरील कामे अतीशय निकृष्ट दर्जाचे असुन काम ईस्टीमेटप्रमाणे न झाल्याने रस्ता व नालीची पडझड झाली आहे व या कामाची गुणवत्ता असमाधानकारक अाहेत व सदर प्रकरणी पाहणी करुन तंतोतंत कारवाई करावी व संबंधीत ठेकेदाराचा परवाना रद्द करावा व दुसर्‍यांदा चांगले काम करुन घ्यावे व चांगले काम करुन घेतले असता देयके अदा करावे अन्यथा करु नयेत.


सबंधीत रोडचे व नालीचे काम ईस्टीमेट प्रमाणे झाले आहे किंवा नाही हे पाहणी करुन अर्जदारास कळवुन त्यांना उपोषणापासुन परावृत्त करावे असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी देवणी मुख्याधिकार्‍यांना दिले आहेत.


शहरातील भ्रष्ट कामांविरोधात रासपाने घेतलेल्या आंदोलन पवित्र्यामुळे बोगस ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.