कवानकर कुटुंबीयांची हत्या की आत्महत्या याचं गुढ कायम नांदेड जिल्ह्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना.....
हदगांव तालुका प्रतिनिधी:- हदगाव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी प्रवीण कवाणकर हे गेल्या अनेक वर्षापासून हदगाव शहरातील मुख्य मार्केटमध्ये किराणा दुकान चालवीत होते तालुक्यात त्यांचा परिचय अतिशय दांडगा असून ते मनमिळावू स्वभावाचे होते त्यातच व्यवसायामध्ये देखील अतिशय एक नंबर असल्याचे समजते तथा त्यांच्या एकत्रित कुटुंबाचा विचार केला तर तालुक्यात हे कुटुंब अतिशय सज्जन म्हणून समजल्या जाते अतिशय शांत व संयमी असलेले प्रवीण च्या कुटुंबावर काही दिवसापासून नियतीचा खेळ चालू होता त्यांच्या कुटुंबातील भावा भावाचा वाद शेती व इतर प्रॉपर्टीच्या कारणावरून वाद वाढत होता याच वादामुळे हदगाव तालुक्यातील मोठे असलेले त्यांचे किराणा दुकान गेल्या आठ दिवसापासून बंद होते तसेच प्रॉपर्टीच्या वादावरून त्यांच्या घरातील भावाभावात शाब्दिक वाद झाल्याचे समजते याच वादातून त्यांनी तालुक्यातील सर्वात मोठे असलेले किराणा दुकान गेल्या आठ दिवसापासून बंद ठेवून ते बाहेर गावी गेल्याचे समजते गेल्या आठ दिवसापासून प्रवीण व प्रवीण चे कुटुंबीय गेल्या आठ दिवसापासून प्रविण व प्रविण चे कुटुंबीय बाहेरगावी गेले असल्याचे माहीत असतानासुद्धा प्रवीणच्या कुटुंब यांनी त्यांचा कोणत्याही प्रकारचा शोधाशोध केला नाही व कुठे असल्याचे जाणून सुद्धा घेतले नाही भावा भावाचा वादामुळे प्रवीणला नैराश्य तुन प्रवीण ने असे केले असावे की कुटुंबीयांना घेऊन काही दिवस बाहेरगावी जावे याच उद्देशाने प्रवीण हादगाव मधून आपल्या स्वतःवरचा मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रवीण आपल्या कुटुंबियांना म्हणजेच त्यांची पत्नी अश्विनी मोठी मुलगी सेजल दुसरी मुलगी समीक्षा व एकुलता एक मुलगा सिद्धेश यांना घेऊन सहस्त्रकुंड धबधबा येथे सहस्त्र कुंड धबधबा हे पाहण्यासाठी गेले ते परत आलेच नाही त्यानंतर दिनांक 30 रोजी प्रवीणचा मृतदेह व त्यांच्या पत्नीचा मृतदेह इस्लापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळून आला आणि तालुक्यात खळबळ माजली मृतदेह आढळल्यामुळे हदगाव तालुक्यात चर्चेला उधाण आले ते म्हणजे प्रवीण चे कुटुंब आठ दिवसापासून घर सोडून गेले असताना सुद्धा त्यांच्या परिवाराने त्यांचा शोध का घेतला नाही आठ दिवस प्रवीण हे घर सोडून गेले असता घरच्यांना का माहित नाही मग अशा प्रकारचे तालुक्यातील जनतेसमोर अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले यामध्ये मुख्य प्रश्न तालुक्यातील जनतेसमोर निर्माण झाला प्रवीणच्या कुटुंबियाने आत्महत्या केली का की प्रॉपर्टीच्या वादातून त्यांचा घात करण्यात आला असेल का असे एक ना अनेक प्रश्न तालुक्यातील जनतेसमोर निर्माण झाले असून त्यांच्या मृत्यूचे गूढ मात्र अद्यापही समोर आले नाही असे असले तरी मात्र प्रवीणच्या कुटुंबीयांचे हत्यारे कोण आहेत हे पाहणे पोलीस प्रशासनासमोर फार मोठे आव्हान ठरले असून एकच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला असल्या मुळे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यात पहिली हृदय पिळवटून टाकणारी घटना घडल्याचे बोलले जाते असे असले तरी मात्र प्रवीणच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सहस्त्रकुंड धबधब्याच्या ठिकाणी जाऊन पंचनामा करून सदर घटनेची चौकशी करण्याचे आदेश संबंधित पोलिस प्रशासनाला दिलआहे असून पोलिस प्रशासन या घटनेकडे कशा पद्धतीने तपास करेल हे पाहणे चुरशीचे ठरले आहे प्रतिनिधी अशोक गायकवाड हदगाव