सहज समर्पण आणि शौर्याचा संगम असणारा स्वातंत्र्य योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते.  --   ॲड .दीपाली औटे

सहज समर्पण आणि शौर्याचा संगम असणारा स्वातंत्र्य योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते.  --   ॲड .दीपाली औटे



        [  ] मनाचा निश्चय, जीवनातील शिस्त आणि ध्येयाची योग्य दिशा व समर्पण वृत्ती या गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेले छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांच्या तेजस्वी इतिहासाला  ओजस्वी बनवण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी आत्मबलिदान दिले असे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे धाडस, साहस, समर्पण आणि शौर्याचा संगम असणारा स्वातंत्र्य योद्धा होते असे मत ॲड. दीपाली औटे यांनी व्यक्त केले.


        [  ] चला कवितेच्या बनात या चळवळी अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, सदस्य लातुर अभिजीत औटे यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या २२६ व्या वाचक संवादात चंद्रशेखर गायकवाड लिखित स्वातंत्र्यासाठी आत्मबलिदान देणारा स्वातंत्र्य यौध्दा छत्रपती संभाजी महाराज या साहित्यकृतीवर ॲड दीपाली औटे यांनी संवाद साधला. त्या पुढे म्हणाल्या की, छत्रपती संभाजी महाराजांची आभाळाएवढी  व्यापकता आणि सागराएवढी अथांगता समजुन घेतली तर आपल्याला कर्तृत्वाच्या आकाशात गरुड भरारी घेण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. त्यांचे कर्तृत्व, नेतृत्व आणि पराक्रमाचे उच्च जीवन मूल्य या सर्वांचा वास्तववादी वेध घेणारी हि साहित्यकृती असल्याचे सांगत सखोल संवाद साधला.


        [  ] फेसबुक लाईव्ह संपन्न झालेल्या या संवादा नंतर झालेल्या चर्चेत  अनेकांनी सहभाग नोंदवला. यावेळी मान्यवरांचा ग्रंथभेट सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. शेवटी अभिजीत औटे यांनी साजेसा अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक अनंत कदम यांनी केले तर आभार कु. आस्था औटे हिने मानले. यशस्वीततेसाठी मुरलीधर जाधव व बालाजी सुवर्णकार यांनी परिश्रम घेतले.