सेवाभावी डाक सेवक श्री राजेश्वर पटणे
डाक सेवक म्हणले की,तो गणवेशातील एक व्यक्ती काखेत एक बॅग घेवून दारोदार पत्रं वाटप करणारा, त्या त्या गावचा सुख दुःखाचा निरोप पोहोचवणारा एक व्यक्ती म्हणून ओळखतो पूर्वीपासूनच लोक डाक सेवकाकडे आपुलकीने पाहतात कारण त्यांच्याकडून गावोगावच्या बातम्या कळतात आज मोबाईल,व्हाट्स अप,संगणकामुळे गावोगावचे निरोप लागलीच कळतात तरीही डाक सेवकाचे महत्व अजूनही काही गोष्टीसाठी का होईना कायम आहे आज भारतीय टपाल दिन त्यानिमित्त एका सेवाभावी डाक सेवकांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख
श्री राजेश्वर काशीनाथ पटणे यांचा जन्म कुमठा ता, उदगीर जि लातूर येथे दि 19 डिसेंम्बर 1975 रोजी एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला त्यांच्या आई वडीलानी शेतीमध्ये राबत आपल्या मुलांना शिक्षण दिले श्री राजेश्वर पटणे यांचे प्राथमिक शिक्षण तोंडार व कुमठा येथे झाले माध्यमिक शिक्षण हेर ,उच्च माध्यमिक शिक्षण वाढवणा ,पदवीचे। शिक्षण शिवाजी महाविद्यालय उदगीर येथे झाले बी ए प्रथम वर्षात असतानाच डाक विभागात जागा निघाल्या आणि त्यात श्री पटणे हे ग्रामिन डाक सेवक म्हणून नियुक्त झाले दि 9 अक्टोबर 1996 रोजी श्री पटणे हे ग्रामीण डाक सेवक म्हणून देवर्जन येथे रुजू झाले तेथे त्यांनी दोन वर्ष सेवा दिली त्यानंतर बनशेलकी येथे दोन वर्षे सेवा बजावली 2000 पासून ब्रँच पोस्ट मास्तर म्हणून मलकापूर येथे रुजू झाले काही वर्षे उदगीर येथे पदोन्नत पोस्टमन म्हणून सेवा दिलीश्री राजेश्वर पटणे हे डाक सेवेत। 25 वर्षे प्रामाणिक सेवा देत आहेत प्रत्येकाला टपाल वेळेवर पोहोचवणे,प्रत्येकाना घरपोच सेवा देणे, त्यांच्या वागण्या बोलण्यामुळे ते प्रत्येकाला आपलेसे वाटतात श्री पटणे रुजू झाले तेव्हा अल्प वेतनावर परंतू प्रामाणिक अन नेक सेवा दिली कामाचा व्याप वाढलेला असताना सुद्धा डोक्यावर कसलाच ताण न घेता हसत खेळत ते सेवा बजावतात टपाल जीवन विमा योजनेत त्यांनी उत्कृष्ट अशी सेवा दिली त्याचा लाभ लाभार्त्याला मिळवून दिला सुकन्या योजना आर डी चे खाते उघडून दिले इंडिया पोस्ट पेमेंट खाते,ए इ पी एस योजना यात त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले डाक विभागात सेवेत कार्यरत श्री पटणे हे ग्रामिण टपाल कर्मचारी संघटना लातूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत शिवाय पोस्टल रिक्रीयशन क्लब उदगीरचे तालुका सचिव आहेत संघटनेच्या माध्यमातून श्री पटणे यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलने ,उपोषणे करीत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला श्री पटणे यांच्या सेवेची नोंद घेऊन त्यांना वेळोवेळी सन्मानित केले उत्कृष्ट टपाल सेवेबद्दल पोस्ट मास्तर जनरल यांचे हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. डाक निरीक्षकांच्या हस्तेही त्यांचा गौरव करण्यात आला मलकापूर ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला कोरोना या महामारीच्या काळातही सेवा दिल्याबद्दल कोरोना योध्दा म्हणून अनेक संघटनांनी त्यांना सन्मानित केले लातूर जिल्हा पोस्टल कर्मचारी पथसंस्थेच्या वतीने उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला टपाल जीवन विमा योजनेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डाक अधीक्षक उस्मानाबाद यांच्याकडून गौरविण्यात आले जीवनात आई वडील,गुरुजनांना आदर्श मानणारे श्री राजेश्वर पटणे याना भविष्यात डाकसेवेबरोबरच उत्कृष्ट शेती व्यवसाय करण्याचा मानस आहे त्यांचे संकल्प यशस्वी होवोत ही सदिच्छा।
शंकर बोईनवाड
उदगीर