तामसा येथे भुसार व्यापाऱ्यांचे दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी दोघांना अटक 18 आरोपी अद्यापही फरारच

तामसा येथे भुसार व्यापाऱ्यांचे दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी दोघांना अटक 18 आरोपी अद्यापही फरारच



 हदगाव तालुका प्रतिनिधी :- हदगाव तालुक्यातील तामसा येथील तुंना जुने बसस्थानक परिसरात असलेल्य तामसा भोकर रोड वरील असलेल्या भुसार व्यापाऱ्यांचे पंधरा ते वीस जणांनी मिळून दुकानाची तोडफोड करून सुमारे 27 हजाराचे नुकसान केल्याची फिर्याद मुस्ताक शहा इस्माईल शहा वय 47 वर्षे यांनी तामसा पोलीस ठाण्यात दिल्यावरून 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी पोलिसांनी दोघांना अटक करून हादगाव न्यायालयात हजर केले असून 18 आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती मिळाली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की तामसा येथे जुने बसस्थानक असलेल्या भोकर तामसा रोड लगत मुस्ताक शहा इस्माईल शहा वय 47 वर्ष राहणार तामसा यांचे भुसार चे दुकान आहे अर्धापूर तामसा माहूर असा सिमेंट रस्त्याचे काम चालू असल्याने दुकाने काढली होती परंतु त्यासह काही व्यापाऱ्यांनी आपले दुकाने त्याच ठिकाणी उभे करून आपापला व्यापार सुरू केला असता तामसा येथील आरोपी असलेल्या व्यक्तीची तेथे जागा आहे असे त्यांचे म्हणणे आहे ते प्रकरण न्यायालयात चालू आहे परंतु अचानक आरोपी मुख्रम अली खान पठाण सुलतान शेख शकूर शेख अहमद यांच्यासह mh38 85 85 व एम एस 26 यु 57 67 या दोन्ही ही वाहनांमध्ये पंधरा ते वीस जण येऊन येथील जागा आमची आहे तुमची औकात काय आहे ते दाखवतो म्हणून दोघांमध्ये चांगलीच हाणामारी झाली व्यापाऱ्यांच्या दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी दोघांना अटक केली तर 18 आरोपी अध्यापही फरार झाले आहेत ही घटना पोलीस स्टेशनच्या हाकेवर असून गर्दीच्या ठिकाणी झाल्यामुळे शेकडो माणसं ही घटना बघण्यासाठी जमले होते तर पोलीस त्या ठिकाणी बरेच उशिरा पोहोचले होते असे सांगण्यात आले असून पुढील तपास ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव मध्ये हे करीत आहेत विशेष म्हणजे तामसा हे शहर शांत व सुव्यवस्थेच शहर म्हणुन ओळखले जाते परंतु रविवारी झालेल्या अचानक राड यामुळेतामसा शहराचे सुव्यवस्था बिघडली की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून होत आहे त्यातच तामसा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हे शहरांमध्ये एवढा मोठा बाहेरगावहून आलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी राडा केला त्यावेळेस होते तरी कुठे असा प्रश्न समोर येत असून तामशामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे की नाही असाही प्रश्न जनसामान्यांमध्ये होत आसुन सदरची झालेली घटना हे अतिशय दुर्दैवी बाब असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे प्रतिनिधी अशोक गायकवाड हदगाव