उदगीर शहरातील आरक्षणे रद्द करून मालकी हक्क देण्याचे राज्यमंत्र्यांकडे रा. काँ. पा. सामाजिक न्याय विभागाची मागणी
उदगीर [प्रतिनिधी ] महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांची उदगीर येथे त्यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग उदगीरच्या वतीने उदगीर शहरातील सर्वे नं.378 व 97 मधील म. फुले नगर, गांधीनगर, संजय नगर, धनगर सोसायटी, वडार गल्ली, संग्राम कॉलनी, गोविंद नगर, चंद्रमा देवी नगर, बागबंदी परिसर येथील आरक्षणे रद्द करून मालकी हक्क देण्यासंदर्भातील निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते शफी हाशमी, सामाजिक न्याय विभागाचे तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे, शहराध्यक्ष प्रेम तोगरे, उपाध्यक्ष अरविंद गिलचे, विशाल चांदोरकर, समाधान सूर्यवंशी, सचिन साळुंके, सचिन कांबळे, धीरज वाघमारे, स्वप्नदीप मसुरे, दीपक गायकवाड, सूरज वाघमारे, अजय जाधव, प्रसाद सूर्यवंशी, विकी बेरे आदींनी दिले. सन्माननीय मंत्री महोदयांनी तात्काल संबंधीत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांस संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याविषयी आदेशित केले. सन्माननीय मंत्री महोदयांनी सर्व सामान्यांच्या प्रश्नांसंदर्भात दाखवलेली तत्पर्यतेबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले जात आहे. या वेळी रा. काँ. पा. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर ,उदगीर पंचायत समितीचे नूतन सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा . डॉ. शिवाजीराव मुळे , शहराध्यक्ष समीर शेख उपस्थित होते.