पत्रकारास अपमानित करणार्या हदगाव गटविकास आधिकार्यावर कार्यवाही करा-
श्रमिक क्रांती अभियान ची मागणी.
खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणार्या हदगावच्या गटविकास आधिकारी यांच्यावर कडक व तत्काळ कार्यवाही करुन पत्रकाराच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आशी मागणी श्रमिक क्रांती अभियान महाराष्ट्र व महाराष्ट्र दलित हक्क समिती या संघटनेच्या वतीने मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे करण्यात आली आहे. तसे निवेदन दि.19/10/2020 रोजी मा.उपजिल्हा आधिकारी उदगीर यांचे मार्फत पाठविण्यात आले आहे.
पत्रकार संघाचे हदगाव तालुका आध्यक्ष व लोक जागृती वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी अशोक गायकवाड यांनी दि.11/10/2020 रोजी हदगावच्या पंचायत समितीला सक्षम गटविकास आधिकारी मिळेल का?या मथळ्याखाली बातमी दिली होती या कारणावरुन गटविकास आधिकारी यानी दि.13/10/2020 रोजी पत्रकार अशोक यांना बोलावून घेऊन त्यांचा आपमानकारक शाब्दिक उच्चारण करुन अपमान केले व खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करणेची धमकी दिली आसल्याचे ही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
तशी तक्रार ही अशोक गायकवाड यानी दि.14/10/2020 रोजी तहसिलदार हदगाव मार्फत जिल्हा आधिकार्याना देऊन कार्यवाहीची मागणी केले आहेत,आसे ही निवेदनात सांगण्यात आले आहे,सदर गटविकास आधिकारी यांचेवर कार्यवाही व्हावी आशी ही मागणी संघटनेनी केली आसुन पत्रकारांनी दिलेली बातमी आधिकार्याचे दोष दाखवत आसते ते पाहुन आधिकारी यानी त्याच्यातील दोष सुधारुन घेणे गरजेचे आहे.आशी प्रतिक्रिया संघटनेने निवेदनात नमुद केले आसुन समाज मनाचे प्रतिबिंब दाखविणार्या पत्रकारांना मारहाण होणे,हल्ले होणे त्यांचा अपमान केला जाणे ही गंभीर बाब असल्याचे ही संघटनेने निवेदनातव्दारे कळविले आहे, पत्रकारांचा अपमान केल्या जाणार्या या घटनेचा संघटनेने निषेध व्यक्त केले आसुन पत्रकाराची निर्भिड पत्रकारिता लोकशाहीला मजबुत बनवत आसते हे लक्षात घेऊन पत्रकारांच्या हित रक्षणासाठी श्रमिक क्रांती अभियान महाराष्ट्र व महाराष्ट्र दलित हक्क समिती या संघटना तत्परतेने पत्रकाराच्या पाठीशी उभ्या आसल्याचा दावा ही संघटनेच्या वतीने निवेदनात नमुद करण्यात आला आहे, पत्रकाराच्या सुरक्षा व रक्षणाची सरकारने आधिक काळजी घ्यावी आशी ही संघटनेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.या निवेदनावर मारुती जयवंतराव गुंडीले (आध्यक्ष), )लक्ष्मण रणदिवे, बालाजी आदावळे,गोविंद शिंदे, प्रकाश गोरीले, अर्चना ताई तोगरे, श्रीदेवी कांबळे.