उदगीर तालुका आरोग्य विभागाच्या वतीने सर्वोत्कृष्ट आशा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला

उदगीर तालुका आरोग्य विभागाच्या वतीने सर्वोत्कृष्ट आशा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला 



उदगीर तालुका आरोग्य विभागाच्या वतीने सर्वोत्कृष्ट आशा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला यावेळी सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा कार्यकर्त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी सभापती प्रा.शिवाजी मुळे, उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले,ज्ञानेश्वर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत कापसे,उद्धव गंभीरे,मनोज गोंदेगावे,विदेश पाटील,नरसिंग जाधव,नंदकुमार बाळे,ओ एस शिंदे,सचिन पंडित यांच्यासह अनेक आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


यावेळी बोलताना सभापती प्रा.शिवाजी मुळे यांनी पंचायत समितीच्या येत्या मासिक बैठकीत आशा कार्यकर्त्यांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवू तसेच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत देखील प्रस्ताव मांडू असे आणि पंचायत समिती आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिला असे आश्वासन दिले.तसेच उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले यांनी बोलताना मानधन वाढसोबतच आशा कार्यकर्त्यांना लागणारे वैद्यकीय साहित्य देखील लवकर कशाप्रकारे देता येईल यासाठी संबंधित विभागाची तात्काळ बैठक लावण्याचे आश्वासन दिले आणि सेवा देत असताना ज्याठिकाणी अडचणी येतील त्या अडचणी दूर करण्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत कापसे यांनी केले तर आभार सचिन पंडित यांनी मांडले.