तामसा येथे दोन क्विंटल गोमांस जप्त; दोघांविरुद्ध तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ....

तामसा येथे दोन क्विंटल गोमांस जप्त; दोघांविरुद्ध तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल .....


 


 



 हदगाव (प्रतिनिधी अशोक गायकवाड) हदगावदगाव तालुक्यातील तामसा येथील वार्ड क्रमांक एकमधील खाटीकगल्ली येथे अनधिकृतरित्या गोमांस विकणाऱ्या दोघांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून दोन क्विंटल गोमांस जप्त करण्याची कार्यवाही तामसा पोलिसांनी शनिवारी (ता. 26) रोजी केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे यांनी गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी येथील खाटीक गल्लीत अनाधिकृतरित्या व विना परवानगीने खुलेआम गोमांस विक्री होत असलेल्या ठिकाणी कर्मचारी शहाजी जोगदंड, शिवाजी आरसुळे, टीमके, जनजवळे, बोडके या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाड टाकली. असून यावेळी आरोपी तकशीर बालेजी कुरेशी (वय ६०)  व महेबुब याकुब कुरेशी (वय ५०)  हे दोघे दोन क्विंटल गोमांसाची विक्री करत होते. पोलिसांनी मुद्देमालासह दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली.  गोमान्स व इतर साहित्याची किंमत अंदाजे ३५ हजार रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे अनधिकृतरित्या  गो तस्करी करून गोमांस विक्री करणाऱ्या शहरातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी फौजदार राम जेगाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून सदरील गोमासे हे तामसा पोलीस ठाण्याच्या परिसरात एक मोठा खड्डा खोदून त्यामध्ये गोमांस टाकून गोमासची विल्हेवाट लावण्यात आली आहे