श्री.महादेव विदयालयात गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार
वलांडी-देवणी तालुक्यातील धनेगाव येथील श्री.महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात 90 टक्केपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य-रामलिंग मुळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून देवणी प.स.सभापती सौ.चित्र कलाताई बिरादार, जि.प.सदस्य-पाटील प्रशांत,पर्यवेक्षक-खोंडे यु.एन. प्रा.कांबळे आर.व्ही.हे उपस्थित होते.याप्रसंगी जढाळे शिवकन्या, बिरादार विशाखा मन्मथ,बिरादार पवन,बिरादार वैष्णवी, बिरादार प्रणिता, बिरादार वेदांत,बिरादार भाग्यश्री, तुगावे प्रीती, साळुंके मनिषा, पोतदार प्रथमेश, चांडेश्वरे कपिल, बैनगिरे ऐश्वर्या, येदले अश्विनी,साकोळे किरण,राठोड धर्मराज, निटुरे हर्षवर्धन, सुर्यवंशी प्रमोद, होळकर मेघा,कांबळे प्रवीण, दोरवे देविदास,गालचिरले प्रदिप ,पाटील श्वेता, कांबळे संजीवनी या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह,ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे देवणी तालुक्यातून दहावीतून जढाळे शिवकन्या,बारावी कला शाखेतून सुर्यवंशी प्रमोद, तर एमसीव्हीसी शाखेतून कांबळे प्रवीण प्रथम येन्याचा मान श्री.महादेव विदयालयाला मिळवून दिला आहे.
यावेळी प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक उपस्थित होते.