मोघा येथे प.पु. डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मोघा येथे प.पु. डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली



राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे 1 सप्टेंबर 2020 रोजी निधन झाले.


आज दि. 13/9/2020 रोजी मोघा येथे शोकसभा आयोजन करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.


याप्रसंगी सर्व प्रथम वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंदर अण्णा वैजापूरे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार,बेल, फुल व दीप प्रज्वलित करुन आदरांजली वाहण्यात आली.


यावेळी शिवशंकर पाटील लोहारकर,डाॅ.सुभाष बिरादार, यांनी अप्पाचे कार्य व जिवन परिचय आपल्या मनोगतातून व्यक्त केले.कार्यक्रमास मुबंई येथे असलेले न्यायाधिश ओमशंकर पाटील,शिवसांब पाटील,पत्रकार बापुराव नराचे,कल्याण बिरादार,चंदर अण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री श्रीकांत पाटील, रविशंकर पाटील, युवा नेते अमोल पाटील, जनार्दन बिरादार, महारूद्र विरकपाळे , रामराव राजुळे ,राजेन्द्र पाटील 


राम काळोजी,चंद्रकांत विरकपाळे,नामदेव आवडोबा,गोविंद आवडोबा,रमेश पांचाळ,आनंद कुभांर, असंख्य गावकरी महिला भक्तगण उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते अमोल पाटील यांनी केले.व सुत्रसंचलन डाॅ. सुभाष बिरादार यांनी केले.