*नगरपंचायतीने लावली देवणीकरांची वाट!एकाच पाण्यात रस्ते झाले भुईसपाट ! ! व्यापाऱ्यांच्या दुकानात वाहतात पाण्याचे पाट
*देवणी* : शहराचा विकास म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असेच म्हणता येईल
शहरातील रस्ते विकासाच्या नावाखाली देवणी नगर पंचायतीचे करोडो रुपये खर्च करून रस्त्याचे कामे अतिशय निकृष्ठ दर्जाचे केले आहे पाण्याचा विसर्ग होण्यासाठी काही गटारा मार्फत बाहेर जाण्याचे नियोजन केले नसल्याने सदर पाणी रस्त्यावर उतरले त्यामुळे एकाच पावसात रस्ते वाहून गेले व रस्त्यावरील पाणी गावाबाहेर जाण्याचे काही नियोजन नसल्याने ते पाणी देवणीतील व्यापाऱ्यांच्या दुकानात व घरात शिरले आहे म्हणून प्रत्येक व्यापाऱ्यांकडून एकच ओरड होतांना दिसतेय नागरपंचयातीने देवणीकराची लावली वाट एकाच पाण्यात रस्ते झाले भुईसपाट व्यापाऱ्यांच्या दुकानात वाहतात पाण्याचे पाट व्यापारी म्हणतात सल्याहो या आता रिंगणात तुम्हाला दाखवु तुमच्या घराची वाट.........
सविस्तर माहिती अशी की देवणी नगर पंचायतीवर निर्विवाद भाजपाची सत्ता आहे तसे पाहत केंद्रात व राज्यात काही काळ भाजपची सत्ता होती आता काही दिवस अपवाद वगळता राज्यात सेना कांग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे
देवणी शहर भाजपा चे गड राहिले आहे योगायोग भाजपची सत्ता देशात अली देवणीकराच्या विकासासंदर्भात अशा पल्लवीत झाल्या परंतु देवणी नगर पंचायतीवर चुकीच्या लोकांची वर्णी लागल्याने देवणीचा विकास होण्याऐवजी भकास झाला म्हटलं तरी वावगे ठरू शकनार नाही
देवणीच्या सर्वांगीण विकासासाठी तत्कालीन भाजपचे पालकमंत्री यांनी देवणीसाठी करोडो रुपये दिले आहे असे सांगण्यात आले परंतु दिलेल्या करोडो रुपये काय झाले याबाबत विकास कामाचा आढावा तत्कालीन पालकमंत्री यांनी घेतला नसल्याने भाजपने दिलेले कोट्यवधी रुपये अक्षरशः पाण्यातच गेले असंच म्हणावं लागेल
देवणी बसस्थानक ते एम एस इ बी रोड जवळपास दीड पावणेदोन कोटींचा रास्ता करण्यात आला आहे रास्ता करून सहा महिने झाले नाही त्यांची हल्लत पहा हे काम अतिशय निकृष्ठ पद्धतीचे केवळ लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या केवळ टक्केवारी साठीच दर्जा हीन केले गेले तसेच तत्कालीन पाणी पुरवठा करण्यासाठी 1 कोटी 80 लाख रुपये वागदारी ते देवणी पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर केले गेले परंतू लोकप्रतिनिधी यांच्या हस्तक्षेप व टक्केवारी मुळे हे काम इतके निकृष्ठ केले गेले 1 कोटी 80 लाख रुपये खर्च करून देवणीक राना आठ दिवस ही पाणी मिळाले नाही तसेच शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड नावाखाली लाखो रुपये शासनाला गंडविले असून नगर पंचायत हद्दी्त एकही वृक्ष दिसून येत नाही कचरा व्यवस्थापन च्या नावाखाली एकदोन वर्षात अनेक लाखो रुपये खर्च करून वाहन खरेदी केले आहेत यांचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे अश्या लाखो रुपये चा भ्रष्टाचार करून व्यापाऱ्यांच्या दुकानात घरांत पाणी सोडणाऱ्याना " मिले सूर मै सूर म्हणून वाटून खाणाऱ्या कांग्रेस पक्षालाही आम्ही सोडणार नसल्याचे व्यापारी यांचे म्हणणे आहे यांचा रोष आगामी नगर पंचायतीत राजकीय लोकांना भोगावा लागणार हे मात्र निश्चित !!!