भाजपाच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी
देवणी प्रतिनिधी
देवणी दिनांक 16 व 17 सप्टेंबर रोजी देवणी शहर व तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील उभ्या पिकाचे नुकसान झाल्याने महसूल प्रशासनाने तात्काळ पीक नुकसानीचे पंचनामें करावे व प्रति हेक्टरी पन्नास हजार रु. मावेजा दयावे ही प्रमुख मागणी भारतीय जनता पार्टी देवणी तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्री, जिल्हाअधिकारी यांना निवेदनाद्वारे नायब तहसीलदार यांच्याकडे शुक्रवारी दि १८ /९/२०२० रोजी निवेदन देवणी तहसिल कार्याल्यात नायब तहसिलदार शेख यांना देण्यात आले या निवेदनावर रामभाऊ तिरूके माजी जि.परिषद उपाध्याक्ष लातुर , जेष्ठ नेते हावगीराव पाटिल , बस्वराज पाटिल , जि.प.सदस्य पृथ्वीराज शिवशिवे , प्रशांत पाटिल जवळगेकर , पचायत समितीच्या सभापती सौ.चिञकला बिरादार , उपसभापती शंकर पाटिल तळेगावकर , जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पटणे , तालूकाध्यक्ष काशिनाथ गरिबे , अमर पाटिल , नगरसेवक मच्छिद्र नरवटे , युवा मोर्चा अध्यक्ष रामलिंग शिरे , शहरअध्यक्ष अटल धनुरे , महेश सज्जनशेटे , मयुर पटणे , बालाजी सूर्यवंशी , हनुमत बिरादार , सुनिल रेडी , आदिच्या स्वाक्ष-या आहेत .