रक्ताच्या गोळ्याने पैसा पाहिला अन् गावाने पाठ फिरवली पण रोटी कपडा बँकेने माणूसकीचा वारसा जपला

रक्ताच्या गोळ्याने पैसा पाहिला अन् गावाने पाठ फिरवली पण रोटी कपडा बँकेने माणूसकीचा वारसा जपला



उदगीर - कोरोनामुळे माणसामध्ये भीतीचे वातावरण इतके पसरले आहे की रक्ताचे नाते सुध्दा तोडत आहे. वेगवेगळ्या देशातील वातावरणानुसार कोरोनाच्या लक्षणाची विविध कारणे जाणवत आहेत. कोरोना रोग असून माणसला मारतो, पण रक्ताच्या नात्याला मारतो हे विपरीतच ऐकायला मिळत आहे.


चोंडी (ता.उदगीर) येथील एका पंचावन्न वर्षीय महिलेचा आकस्मिक मृत्यू झाला. कोरोनाच्या दहशतीने अख्या गावातील एकही जण अंत्यविधीसाठी पुढे आला नाही. या महिलेच्या पतीने शहरातील रोटी कपडा बँकेला मदत मागितली. या बँकेच्या टिमने गावात जाऊन अंत्यसंस्कार केल्याने या कुटुंबाला धीर आला. अख्ख्या गावाने डावललेल्या महिलेच्या मृतदेहावर रोटी कपडा बँकेने अंत्यसंस्कार करून आधार दिला आहे.


चोंडी येथे राहणारे एक गरीब कुटुंब. कुटूंबात नवरा-बायको व एक मुलगी. अचानक या कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाला. या कुटुंबातील कोणालाही कोरोनाची लागण झाल्याची परिस्थितीत नसतानाही सांत्वन करण्यासाठी तर सोडाच पण अंत्यविधीसाठी गावातील कोणीही जवळ आले नाही.


 पोटच्या गोळ्याने पैसा लागतो, वेळ नाही कोणाकडून तर करून घ्या पैसे पाठवतो म्हणून आपले कर्तव्य मुंबईतूनच पार पाडले. नातेवाईक , शेजार पाजार यांनी सुद्धा पाठ फिरवली. ज्यांचा संसार आयुष्यभर गावात राहून केला , इतरांच्या सुख - दुःखात हातभार लावला आज त्याच कुटुंबातील प्रमुख त्या माऊलीला कुणाच्याही माणूसकीचे नाते कामाला आले नाही. गावातील माणसांनीच पाठ फिरवल्याने फार मोठे संकट या कुटुंबावर पडले. गावातील समाज सुधारक, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक संघटना अशा घटनेच्या वेळेस कोठे जातात ? सरपंच, पोलीस पाटिल, तलाठी, ग्रामसेवक, ग्रा.पं.सदस्य यांचे कर्तव्य कोठे गेले? पण ज्याने विश्व निर्माण केले त्याने सर्व व्यवस्था केलेली आहे. या परिस्थितीमध्ये कोणीतरी या व्यक्तीला उदगीरच्या रोटी कपडा बँके विषयी माहिती देऊन मदत करण्याची विनंती करण्याचा सल्ला दिला.त्यानुसार या व्यक्तीने रोटी कपडा बँकेच्या गौस शेख यांच्याशी संपर्क केला व त्यांना अशी परिस्थिती निर्माण झाली असून आपण अंत्यसंस्कार करावेत अशी विनंती केली. उदगीर शहरात अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक प्रेतावर या रोटी कपडा बँकेच्या युवकानी अंत्यसंस्कार केले होते.


या बँकेच्या युवकांनी त्यांना लगेच होकार देऊन सोमवारी (ता.सात) रात्री चोंडी येथील सार्वजनिक स्मशान भूमीत या महिलेवर अंत्यसंस्कार केले.या अंत्य विधीकडे ग्रामस्थानी फिरकूनही पाहिले नसल्याचे श्री शेख यांनी यावेळी सांगितले. या अंत्यसंस्कारासाठी बेघर निवारा केंद्र चालवणाऱ्या `सलात' (रोटी कपडा बँक) या संस्थेच्या गौस शेख, समीर शेख, जावेद शेख अमजद मणियार, कलीम शेख, अखिल शेख आदीयुकांचा या टिममध्ये समावेश आहे.


बेघर निवारा केंद्र चालवणाऱ्या `सलात' (रोटी कपडा बँक) या युवकांनी गावाने झिडकारले असतानाही पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केला. देव तारी त्याला कोण मारी असे म्हणतात पण मेल्यानंतर ही त्याचं कोण सारत नाही असं म्हणणं चुकीचे म्हणावे लागेल.