नळगीर गावच्या ग्राम विकास आधिकार्याची बदली रद्द,श्रमिक क्रांतीचे यश.

नळगीर गावच्या ग्राम विकास आधिकार्याची बदली रद्द,श्रमिक क्रांतीचे यश.


-----------------------------


मा.सभापतीनी मांडली बाजु मा.मुख्य कार्यकारी आधिकार्यानी महोदयानी दिला निर्णय.


नळगीर गावच्या काही निवडक लोकांच्या तक्रारी मुळे नळगीर गावचे ग्रामविकास आधिकारी प्रकाश पवार यांची बदली करण्यात येऊन तसा आदेश ही काढण्यात आला होता,मात्र सदर ग्राम विकास आधिकारी पवार यांनी कोरोना महामारीच्या संकटात रात्र दिवस गावकर्यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न केले आसल्याची व त्या शिवाय शेतकरी शेतमजुरांच्या कल्याणासाठी पवार यानी तत्परतेने सतत कार्य केले आसल्याचे निवेदनात नमुद करुन त्यांच्या बदलीचा आदेश रद्द करण्यात यावा आशी मागणी श्रमिक क्रांती आभियान महाराष्ट्र या बिगर राजकीय संघटनेच्या वतीने करण्यात करण्यात आली होती,या मागणीचे निवेदन मा.गटविकास आधिकारी उदगीर,मा. उपजिल्हा आधिकारी साहेब,उदगीर मा.सभापती राहुलजी केंद्रे जि.प.लातुर यांच्या कडे दि.24/8/2020 रोजी देण्यात आले होते नळगीर गावचे ग्राम विकास आधिकारी प्रकाश पवार यांची बदली करणेचा घाट काही स्वार्थी लोक घालत आसल्याचे व त्याची बदली होणे नळगीर ग्रामस्थावर आन्याय केल्या सारखे होईल आशी भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली होती, या निवेदनातील नमुद बाबीचा विचार करुन मा.सभापती राहुलजी केंद्रे यानी संघटनेच्या मागणीची न्याय बाजु मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प्र.लातुर यांचेकडे लावुन धरली आसल्याने मा.मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयानी सदर निवेदनातील नमुद मागणीचा व संघटनेच्या स्वच्छ भावनेचा विचार करुन मा.ग्रामविकास आधिकारी प्रकाश पवार यांच्या बदलीचा आदेश रद्द केले आसुन तसे आदेश पत्र मा.गटविकास आधिकारी उदगीर यांचेकडे दि.1/9/2020 रोजी देण्यात आले आहे,यामुळे गावातील सामान्य जनात उत्साहाचे वातावरण आसुन संबधीत बदली रद्द करणेसाठी संघटना मागणीची बाजु धरुन प्रयत्न करणारे नळगीर गावचे सरपंच मा.संगम शेटकार,मा.सभापती राहुलजी केंद्रे व या बदली रद्द चा आदेश देणारे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प्र.लातुर यांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आसुन कोणत्याही आधिकार्या विरुद्ध कोणताही पुरावा नसताना त्यांच्यावर आरोप करुन चांगल्या आधिकार्यास दोषी घोषीत करुन त्यांच्या कृतुत्वाला दोषी ठरविणे आन्यायकारक आसुन,कायदेशीर काम करणार्यां आधिकार्याच्या पाठीशी संघटना समर्थपणे उभी आसुन बेकायदेशीर वागणार्या आधिकार्यास माफ ही करीत नाही आशी प्रतिक्रिया संघटनेचे मारुती गुंडीले,सह राजकुमार सुर्यवंशी,लक्ष्मण रणदिवे, गोविंद शिंदे,विकास दिलीप बलांडे इत्यादीनी दिली आहे,