एस.टी.महामंडळचे दुर्लक्ष 

एस.टी.महामंडळचे दुर्लक्ष


बस प्रवास प्रवाशाच्या जिवाला धोका ऩिर्माण करणारा प्रवास


हाळी हंडरगुळी 


   महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) बसचा प्रवास सुखाचा प्रवास असे संबोधले जाते मात्र आजच्या काळात तो प्रवास राहिला नाही. एम.एच.14 बि.टी.1828 या नंबरची बस काल सकाळी दहाच्या सुमारास उदगीर - शिरुर (ता) रोडवर मोरेवाडी पाटी जवळ एस.टी.बस चे डाव्या बाजुचे मागील दोन टायर पैकी एक टायर गाडी चालताना बाजुला निघुन पडले मोठी हानी टळली.काही घटना घडली असती तर याला जबाबदार कोण?कदाचित आगारातील व्यवस्थापण योग्य नसेल.


                      काल सकाळी अहमदपुर आगाराची बस चालतानाच एक टायर निघुन गेले ड्रायव्हराला सांगितले तेव्हा लक्षात आले.कोरोना संसर्ग यामुळे प्रत्येक व्यक्तीला भिती निर्माण झाली आहे.काही कामानिमित्त घराबाहेर पडले तर प्रवास बसचा प्रवास सुखाचा प्रवास म्हणुन बघीतले जाते सामाजिक आंतर पाळण्यासाठी बस चांगली यासाठी प्रवासी बसकडे पाहतात जर अशा घटना घडत असतील तर याला जबाबदार कोण? जेव्हा बस प्रवासी वाहतुकीसाठी बाहेर पडते तेव्हा परीपुर्ण पाहणी करुन प्रवासाच्या सेवेसाठी उपलब्ध असते मग असे का घडते कोणाचे लक्ष नाही हा प्रश्न उभा राहतो.तरी बस प्रवास असा धोकादायक ठरत असला तर बस प्रवास प्रवाश्याने कसा करायचा.काही दिवसापुर्वी लातुर - शिरुर (ता) रोडवर तेलगाव पाटीच्या पुढे बसचा ड्रायव्हरचा टफ निखळला होता व तो उडून गाडी चालत असताना रोडवर पडला होता.अशा घटना वांरवार होत असतील तर बस प्रवासाकडे प्रवाश्याने कुठल्या विचाराने पहावे प्रवास करावा की करु नेय असा विचार प्रवाश्याच्या मनात येणारच.


            ग्रामिण भागामध्ये बस सेवा फारच महत्वाची भुमिका पार पाडते.ब-याच वेळा बस पंचर झाली तर बस सोबत जाँक किंवा बरेच साहित्य त्या गाडीत उपलब्ध नसते दुस-या गाडीमधुन घ्यावे लागते,ब-याच रुटवर खिळखिळ्या बस धावताना पाहण्यात येतात त्याच बरोबर प्रदुषण निर्माण करणा-या बस पण धावतात.त्यामध्येच पडत असलेल्या पावसामुळे तर रोडवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.


                                  अहमदपुर येथील आगार प्रमुख सोनवने यांच्याशी संपर्क केला असता योग्य ती चौकशी करुन जो कोणी कर्मचारी दोषी असेल त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल व ती करु असे अश्वासन आगार प्रमुख यांच्याकडून मिळाले आहे.