उदगीर पंचायत समिती आढावा बैठक !!
पर्यावरण,पाणीपुरवठा,रोजगार हमी योजना,सार्वजनिक बांधकाम, संसदीय कार्य राज्यमंत्री मा.ना.श्री.संजयभाऊ बनसोडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे,पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजी मुळे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील,पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले,उपमुख्यधिकारी संतोष जोशी, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी,तहसीलदार वेंकटेश मुंडे,सुभाष धनुरे,माजी सभापती सत्यकला गंभीरे,माधव कांबळे,तृप्ती धुप्पे, शरदाबाई बाळे, शिलाबाई जाधव,सारजाबाई पाटील,अनिता गोंदेगावे,रणजित कांबळे, गोविंद कोंपले उपस्थित होते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीतील ठळक मुद्दे -
(१)उदगीर तालुक्यातील मोडकळीस आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीचे प्रस्ताव तात्काळ सादर करणे
(२) मनरेगा अंतर्गत वैयक्तिक विहिरींना तात्काळ कार्यरंभ आदेश देणे
(३)मनरेगाच्या विहिरींना मान्यता देण्याचे अधिकार पूर्वीप्रमाणे गटविकास अधिकारी यांना देणे
(४)बांधकाम कामगार मजूर नोंदनी करण्यासाठी येणारे अडथळे दूर करणे
(५)ग्रामीण भागातील महावितरण संबंधित अडचणी तसेच तात्काळ ट्रान्सफॉर्मर पुरविणे आणि इतर साहित्य पुरवठा करणे
(६)जलजीवन मिशन योजनेस गती देणे
(७)रोजगार हमी योजनेची कामे सुरू करणे
(८)घरकुल योजनेस लागणाऱ्या निधीसाठी प्रयत्न करणे
यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली