तामसा सरपंच विरुद्धची याचिका जिल्हाधिकारीकडून खारीज

तामसा सरपंच विरुद्धची याचिका जिल्हाधिकारीकडून खारीज


हदगाव, तालुका प्रतिनिधी हदगांव तालुक्यातील तामसा येथील सरपंच रंजना नारेवाड (भंडारवाड) यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याच्या कारणावरून त्यांचे सरपंचपद रद्द करण्याची मागणी करणारी याचिका जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटणकर यांनी बुधवारी ता.२३ नामंजूर करून प्रकरण निकाली काढले आहे. तामसा येथील याचिकाकर्त्याने सरपंच भंडारवाड  यांनी जातवैधता प्रमाणपत्र अद्यापही सादर केले नसून त्यांना पदावरून मुक्त करावी, अशी मागणी करणारी याचिका वादीकडून  वकिलामार्फत जुलै महिन्यात केली होती. प्रतिवादीची बाजू एड. एम. ए. एकताटे यांनी मांडली. जिल्हाधिकारी इटनकर यांनी वादी व प्रतिवादी यांच्या वकिलांनी सदर प्रकरणात सादर केलेल्या बाबी, पुरावे, म्हणने ऐकून घेतले. शासनाच्या  सुधारित कायद्यानुसार आरक्षित जागेवर निवडणूक लढवून विजयी झालेल्या लोकप्रतिनिधीला जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न झाल्यास संबंधित लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व भूतलक्षी प्रभावाने तात्काळ रद्द होणार असल्याची तरतूद सुधारित कायद्यात आहे.  रंजना नारेवाड यांची सरपंचपदी निवड ता. ३१ डिसेंबर २०१९ ला झाली आहे. त्यामुळे त्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची एक वर्षाची मुदत संपण्यास अंदाजे चार महिन्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असल्याचे जिल्हाधिकारी इटनकर यांच्या लक्षात सर्व कागदपत्राची तपासणी केल्यानंतर आले. या सर्व बाबींनुसार शासनाच्या सुधारीत निवडणुक कायद्यातील तरतुदी अन्वये जिल्हाधिकारी इटनकर यांनी सरपंच रंजना नारेवाड (भंडारवाड) यांच्याविरुद्धची याचिका नामंजूर करीत प्रकरण निकाली काढण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. यामुळे या प्रकरणात खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्