तामसा शहरातील दलित वस्ती मधील हायमॅक्स ब्लॅपची चौकशी अद्यापही गुलदस्त्यात....
हदगाव तालुका प्रतिनिधी.तामसा शहरातील दलित वस्तीमध्ये यादी निहाय शासनाने हायमॅक्स ब्लॅप बसवण्यासाठी तामसा ग्रामपंचायतला अंदाजे वीस लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता परंतु शासनाचे निकष बाजूला ठेवून तामसा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांनी दलित वस्ती मधील आलेले हायमॅक्स ब्लप इतर वस्तीमध्ये बसवण्यात आले यामुळे शहरातील दलित वस्तीमध्ये सध्या अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे तामसा शहरातील दलित वस्ती मधील हायमॅक्स ब्लॅपची चौकशी अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे दिसून येत आहे
शासनाकडून दलित वस्ती मधील विकास व्हावा व तेथील जनता कोणत्याही विकासापासून वंचित राहू नये असा शासनाचा हेतू आहे त्याचबरोबर दलित वस्ती मधील नागरिक अंधारातून प्रकाशाकडे यावे हे शासनाची संकल्पना आहे परंतु शासनाचेच काही भ्रष्ट अधिकारी अशा चांगल्या योजनेला बगल देत आपल्या फायद्यासाठी दलित वस्तीमध्ये आलेले हायमॅक्स ब्लप इतर वस्तीमध्ये बसविण्यात आंग्रे सर असल्याचे तामसा शहरातील दलित वस्ती मधील हाय मॅक्स ब्लप वरून तरी दिसून येत आहेत त्यामुळे या प्रकरणाची हदगावचे गटविकास अधिकारी सुद्धा चौकशी करण्यासाठी पुढे धजावत नसल्याचे पाहावयास मिळत आहे
तसेच तामसा शहरातील दलित वस्ती मधील गोरगरीब नागरिकांना आपल्या वस्तीमध्ये हायमॅक्स ब्लॅप आले याची कल्पनासुद्धा नाही कारण दलित वस्ती मधील नागरिक हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदाहर निवार करतात त्यामुळे शासनाने दलित वस्तीसाठी आलेल्या हायमॅक्स ब्लपची त्या गरीब वस्तीतील नागरिकांना काय कल्पना हे दुर्दैवी बाब आहे त्यामुळेच आज घडीला तामसा शहरातील दलित वस्ती मधील नागरिक अंधाराचा सामना करत आपले जीवन जगत आहेत परंतु दलित वस्ती मधील नागरिक अंधारातून उजेडा यावे म्हणून त्यांच्या हक्काचे शासनाने दिलेले हायमॅक्स ब्लॅप हे तामसा ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकार्यांनी हम करे सो कायदाचा अवलंब करित सदरील दलित वस्तीमध्ये आलेले हायमॅक्स ब्लॅप इतर वस्तीमध्ये बसवण्यात आले आहे त्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तामसा शहरातील दलित वस्ती मधील नागरिकांकडून होत आहे
विशेष म्हणजे तामसा शहरातील दलित वस्ती मध्ये शासनाने हाय मॅक्स ब्लप बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता परंतु त्या निधीचा दुरुपयोग करत तामसा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांनी इतर ठिकाणी ते हायमॅक्स ब्लॅप बसवल्यामुळे तामसा शहरातील दलित वस्ती मधील नागरिक त्यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत आहेत तरीदेखील हदगावचे गटविकास अधिकारी हे या हायमॅक्स ब्लॅपची चौकशी करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत त्यामुळे गटविकास अधिकार्यांना कोण्या राजकीय व्यक्तीचा दबाव येते की काय असा प्रश्न तामसा शहरातील दलित वस्ती मधील नागरिकांकडून होत आहे
याशिवाय दलित वस्ती मधील हायमॅक्स ब्लॅपची चौकशी अद्यापही गुलदस्त्यात आहे याचे कारण म्हणजे हादगावचे गटविकास अधिकारी हे कारणीभूत आहेत कारण त्या प्रकरणाची कुणी तरी तक्रार दिली तरच मी चौकशी करतो असे आमच्या प्रतिनिधीला प्रत्यक्ष गट विकास अधिकारी यांनी बोलून दाखविली आहे त्यामुळे दलित वस्ती मधील हायमॅक्स ब्लपच्या भ्रष्टाचारामध्ये हदगावच्या गट विकास अधिकारी यांचा देखील सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तामसा शहरातील दलित वस्ती मधील यादीनिह आलेल्या वस्तीमध्ये हायमॅक्स ब्लपची चौकशी करून संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांसह हदगावच्या गट विकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तामसा शहरातील दलित वस्ती मधील नागरिकाकडून होत आहे प्रतिनिधी अशोक गायकवाड हदगाव