उत्तर प्रदेशातील दलित युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील
उदगीर [प्रतिनिधी] उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील एका 19 वर्षीय दलित युवतीवर 4 नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आहे. त्यात पीडितेचा मृत्यू झाला आहे. त्या नराधमांना तात्काळ अटक करून, फाशी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग उदगीरच्या वतीने उदगीरचे उपजिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे .
उत्तर प्रदेशामध्ये महिला व दलित समाजाचे जीवन असुरक्षित आहे .या अशा घटना वारंवार घडत आहेत. या घटनेस तेथील सरकार जबाबदार आहे. अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.
या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते शफी हाशमी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामजिक न्याय विभाग उदगीरचे तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे, शहराध्यक्ष प्रेम तोगरे, शहर कार्याध्यक्ष रंजित भांगे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गिलचे, धोंडिबा कांबळे, शालीवान सोनकांबळे, गणपत वाघमारे, लहू कांबळे, राहुल सोनकांबळे, विशाल चांदोरकर, समाधान सूर्यवंशी, धीरज वाघमारे, राहुल सोनकांबळे, सूरज वाघमारे, महेश गायकवाड, राहुल कदम, अमोल काकडे, प्रसाद सूर्यवंशी, समाधान सूर्यवंशी, विक्की बेरे,अभय बलांडे, प्रा.विष्णू कांबळे, सोनू हाशमी, अमन तांबोळी आदी सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.