मिठाईच्या पॅकेट वर एक्सपायरी डेट लिहिणं मिठाई विक्रेत्यांना बंधन कारक - अन्न आणि औषध प्रशासन

मिठाईच्या पॅकेट वर एक्सपायरी डेट लिहिणं मिठाई विक्रेत्यांना बंधन कारक - अन्न आणि औषध प्रशासन


महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मिठाईच्या पॅकेट वर एक्सपायरी डेट लिहिणं मिठाई विक्रेत्यांना बंधन कारक केले आहे. मिठाईच्या दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या गोड तिखट पदार्थांच्या पॅकेट वर एक्सपायरी डेट लिहिणं आवश्यक आहे , तसेच मिठाई विक्रेत्यांना एक्सपायरी डेट लिहिणं बंधनकारक आहे. मिठाईच्या पॅकेट वर एक्सपायरी डेट नसेल तर त्या मिठाई विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश दिले आहेत. कारण मिठाई तयार करताना शिळा मावा वापरून जर मिठाईचे पदार्थ तयार केले तर कुबट वास येतो आणि असे मिठाई पदार्थ खाल्ल्याने ग्राहकांच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात. मिठाई खरेदी करताना ग्राहकांनी मिठाई विक्रेत्यांनी मिठाईच्या पॅकेट वर लिहिल्याप्रमाणे एक्सपायरी डेट बरोबर आहे का हे तपासून घेणे आवश्यक आहे.एक्सपायरी डेट बरोबर असेल तरच मिठाई खरेदी करावी.अशी माहितीअन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिली आहे.