तामसा शहरातील दलित वस्ती मधील हायमॅक्स ब्लप गेले कुणीकडे....

तामसा शहरातील दलित वस्ती मधील हायमॅक्स ब्लप गेले कुणीकडे....



हादगाव तालुका प्रतिनिधी:-हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व बाजारपेठ म्हणून तामसा शहराची ओळख आहे त्यातच या ठिकाणी दलित वस्ती मधील विकास व्हावा याकरिता शासनाने तामसा ग्रामपंचायतला शहरातील विविध दलित वस्तीमध्ये चार-पाच महिने खाली हायमॅक्स ब्लप बसून अंधारामधुन उजेडा मध्ये आणण्याकरिताअंदाजे वीस लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता परंतु हायमॅक्स ब्लॅप हेदलित वस्तीमध्ये न बसवता इतर वस्त्यांमध्ये सदरील हायमॅक्स ब्लप बसवण्यात आले आहेत त्यामुळे दलित वस्ती मधील हायमॅक्स ब्लप गेले कुणीकडे असा सवाल शहरातील दलित वस्ती मधील जनतेकडून होत आहे


तसेच तमसा शहरातील विविध दलितवस्ती वार्डयामध्ये शासनाने अंदाजे 18 लक्ष रुपयांच्यासीसी रस्त्याच्या कामाकरिता निधी उपलब्ध करून दिला आहे परंतु दलित वस्ती मधील रस्त्याच्या कामांमध्ये स्थानिक ग्रामपंचायत सदस्यसह हदगाव हिमायतनगर तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी सदरील दलित वस्ती मधील काम थांबविण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना दबाव टाकून सदरचे काम थांबवलेल्या जात आहेत त्यामुळे तामसा शहरातील दलित वस्ती मधील विकास कामांमध्ये जातीयता लोकप्रतिनिधी आणत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे तामसा शहरातील दलित वस्ती वार्डमधील दलिताचा विकास खुटत असल्याचे यावरून दिसून येत आहे


विशेष म्हणजे शासन स्तरावरून दलित वस्त्यांचा विकास व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला जातो परंतु तामसा ग्रामपंचायतीच्या काही ग्रा .प. सदस्यानेदलित वस्ती मधील विकास होऊ नये म्हणून लेखी तक्रार ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना करून सदरील दलित वस्ती मधील सि. सि. रस्त्याचे कामे थांबवावे व सदरील सि.सि. रस्त्याचे कामे हैकाही दिवसानंतर करण्यात यावे असेही तक्रारीत म्हटले आहे त्यामुळे शहरातील ग्रा पं सदस्य सदस्यांना व हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना दलितांचा विसर पडला की काय असाही प्रश्‍न समोर येत आहे म्हणूनच दलित वस्ती मधे आलेल्या हायमॅक्स ब्लप इतर वस्तीमध्ये बसविण्यात आलेआहे त्यामुळे दलित वस्तीमध्ये आलेले हायमॅक्स ब्लप गेले कुणीकडे असाही सूर निघत आहे याशिवाय दलित वस्ती मध्ये आलेले सि.सि.रस्त्याचे कामेही थांबवि ल्यामुळे आज घडीला तामसा शहरातील दलित वस्तीमध्ये चिखलाचे साम्राज्य व अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे तरी देखील याचे गांभीर्य लोकप्रतिनिधींना व ग्रा पं सदस्यांनाकाहीच वाटत नसल्याचे दिसून येत आहे तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन दलित वस्तीमध्ये बसवण्यासाठी आलेले हायमॅक्स ब्लप याची चौकशी करून दलित वस्तीमध्ये सदरील हायमॅक्स ब्लप बसविण्यात यावे त्याचबरोबर दलित वस्ती मधील सि.सि.रस्त्याचे कामे तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी तामसा शहरातील दलित वस्ती मधील नागरिकांकडून होत आहे अशोक गायकवाड हदगाव