पी.टी.ए.च्या वतीने नूतन पंचायत समिती सभापती प्रा.शिवाजीराव मुळे सरांचा भव्य सत्कार संपन्न
राष्ट्रवादी काँग्रेसचे 14 पैकी एकमेव सदस्य असून आपल्या कर्तत्व व नेतृत्वच्या बळावर पंचायत समितीच्या सभापती पदी विराजमान होऊन इतिहास घडविलेल्या प्रा. शिवाजीराव मुळे सरांचा खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीने 17सप्टेंबर या ऐतिहासिक दिनी भव्य सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी सहकारमहर्षी, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंदरआण्णा वैजापुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पाटील साहेब, चंदर आण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील साहेब, पी.टी.ए चे राज्य उपाध्यक्ष प्रा.गोपाळकृष्ण घोडके सर, पी.टी.ए चे तालुका अध्यक्ष प्रा. सिध्देश्वर पटणे सर, पी.टी.ए.चे सचिव प्रा. प्रदीप वीरकपाळे सर इत्यादी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले तर त्यानंतर सत्कारमूर्ती प्रा.शिवाजीराव मुळे सर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन यथोचीत भव्य सत्कार करण्यात आला.यानंतर प्रा.सिध्देश्वर पटणे, प्रा. प्रदीप वीरकपाळे, प्रा.गोपाळकृष्ण घोडके यांनी आपले मनोगत व्यक्त करून मुळे सरांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर मुळे सरांनी सत्काराला उत्तर देताना पी.टी.ए चे आम्हाला सदैव सहकार्य राहिले असून आम्ही सदैव पी.टी.ए च्या पाठीशी आहोत असे सांगून माझ्या आई वडिलांनी माझे नाव शिवाजी ठेवले आहे आणि छत्रपती शिवाजी हे माझे आदर्श आहेत त्यामुळे या नावाला डाग लागेल अस कृत्य मी कधीच करणार नाही असे उद्गार काढताचा सभागृहात टाळ्याचा कडकडाट झाला. शेवटी बोलताना मुळे सर म्हणाले की पंचायत समिती सदस्यांनी व उदगीर तालुक्यातील जनतेनी टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही असा शब्द मी तुम्हाला देतो आणि सदैव आपल्या आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी राहतो.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.संजय जामकर तर प्रास्ताविक व आभार प्रा. सिध्देश्वर पटणे यांनी केले.या कार्यक्रमासाठी डॉ.धनंजय पाटील, प्रा.सोमनाथ बिराजदार, प्रा.योगेश पाटील, प्रा.रविकिरण पतंगे, प्रा.रामचंद्र बिरादार, प्रा.राजकुमार बिरादार, प्रा.सचिन शिंदे, प्रा.राजकुमार तोंडारे, प्रा.संतोष ख्याडे,प्रा.नितीन उबाळे,प्रा.जावेद शेख, प्रा.राहूल बेद्रे, विकास दुपारे, ज्ञानेश्वर माने, चंद्रकांत काटवाटे, वैभव टेकाळे यांच्यासहित पी.टी.ए. चे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.