लाईफ केअर येथे अमोल भालेराव यांच्या हस्ते डोळ्याची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाना चष्मे वाटप

लाईफ केअर येथे अमोल भालेराव यांच्या हस्ते डोळ्याची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाना चष्मे वाटप



उदगीर  


     उदगीर येथे माजी आ.सुधाकर भालेराव यांच्या प्रयत्नाने सुरु करण्यात आलेल्या लाईफ केअर हॉस्पिटल येथे रुग्णांवर नेत्र शस्त्र क्रिया सुरु करण्यात आल्या आहेत . मोतीबिंदू शस्त्रक्रीया झालेल्या रुग्णाना सी ओ ओ अमोल भालेराव यांच्या हस्ते चष्म्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नेत्र तज्ञ डॉ. रामेश्वर चामले , डॉ ग्यान विकास , डॉ विनोद खेडकर ,डॉ पवन महाजन , संतोष जोशी, आशा रेड्डी , रेखा पवार, उत्तम राठोड , आकाश रेखलवाळ उपस्थीत होते.


  एस बी सी सी लि कंपनी अंतर्गत लाईफ केअर हॉस्पिटल नव्या स्वरुपात , अत्याधुनिक उपकरनांसह नव्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण सेवेसाठी सज्ज झाले आहे.सर्व प्रकारचे उपचार , तपासणी आणि शस्त्रक्रिया यासह सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर यांच्या द्वारे अचुक निदान आणि उपचारासाठी आता रुग्नाना पुणे मुंबई येथे जाण्याची गरज रहिली नाही .


  सध्याच्या कोरोना परिस्थितीत सर्व सुविधा आणि सुपर स्पेशालिटी डॉक्टर यांच्या सोबतच रुग्नासाठी हॉस्पिटल अंतर्गत कँटीन द्वारे पार्सल सेवा , आणि विविध तपासण्याची सुविधा असल्यामूळे रुग्णाची परेशानी आणि वेळ वाचणार आहे. 


  लाईफ केअर हॉस्पिटल येथिल अत्याधुनिक उपकरणांसह सज्ज असलेल्या तज्ञ डॉक्टराच्या मार्ग दर्शनाखाली रुग्णांनी उपचार आणि शस्त्रक्रिया करुन घ्यावेत असे आवाहन माजी आमदार तथा एस बी सी सी चे चेअरमन सुधाकर भालेराव यानी केले आहे.


लाईफ केअर येथे मोतीबिंदू ,पडदा , यासह इतर नेत्र शस्त्र क्रिया करण्यात येत आहेत . यासाठी स्वतंत्र वार्ड़ आणि स्पेशल रुम ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अधिक माहिती साठी संतोष जोशी 9545054511 यावर संपर्क साधावा