सत्य आणि उच्च तत्त्वांचा शोध घ्यायला लावणारे युवक संभोग आणि प्रेम होय. -- प्रा.संभाजी जाधव

सत्य आणि उच्च तत्त्वांचा शोध घ्यायला लावणारे युवक संभोग आणि प्रेम होय. -- प्रा.संभाजी जाधव



[ ] मानवाचा खरा विकास साधायचा असेल तर प्रत्येकानं जीवनाच्या सामान्यातेपेक्षा उच्चतेचा शोध घ्यावा लागेल. तरुणांनीआधुनिकतेचा विचार करत प्रेमाला मोकळेपणाने समजून घेतले पाहिजे कारण त्यामुळे खरे वास्तव कळेल व त्यातुन मानवाची सुटका होईल. यासाठी युवकांना सत्य आणि उच्च तत्त्वांचा शोध घ्यायला लावणारे युवक संभोग आणि प्रेम होय असे मत प्रा. संभाजीराव जाधव यांनी व्यक्त केले.


[ ] ॲड.काशिनाथ मोरे तोबरे यांनीअध्यक्षस्थान भूषवलेल्या चला कवितेच्या बनात या चळवळी अंतर्गत पार पडलेल्या २२४ व्या वाचक संवादात ओशो रजनीश लिखित युवक संभोग आणि प्रेम या साहित्यकृतीवर प्रा.संभाजी जाधव यांनी संवाद साधताना म्हणाले की, एखादी गोष्ट जेवढी टाळायचा प्रयत्न केला तेवढीच ती महत्वाची बनतजाते. ज्या गोष्टी उघड बोलण्याचे टाळले जाते त्याबद्दल आकर्षण वाढते. आपल्यामध्ये जेव्हा आत्मीयता असते तेव्हाच सुख मिळते. माणसाला स्वभावतःच कामभावनेच आकर्षण सर्वात जास्त असतं असा सखोल संवाद साधला.


[ ] फेसबुक लाईव्ह संपन्न झालेल्या या संवादा नंतर झालेल्या चर्चेत मुरलीधर जाधव यांचेसह अनेकांनी सहभाग नोंदवला.यावेळी मान्यवरांचा ग्रंथभेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. शेवटी ॲड काशिनाथ मोरे तोबरे यांनी साजेसा अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक अनंत कदम यांनी केले तर आभार सचिन जाधव यांनी मानले.