नामदार संजयभाऊ बनसोडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर...!!!
पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना शासनस्तरावरून काय मदत मिळते याचा आढावा घेऊन मदत करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व सार्वजनिक बांधकाम मंत्री संजयभाऊ बनसोडे यांनी दिली.
राज्याचे पाणीपुरवठा व सार्वजनिक बांधकाम मंत्री संजय बनसोडे उदगीर दौऱ्यावर आले पावसामुळे शेतकर्यांच्या झालेल्या शेतकरी नुकसानीची पाहणी केली या पाहणी दरम्यान त्यांच्यासोबत कृषी अधिकारी तसेच उदगीर पंचायत समितीचे नवनियुक्त सभापती प्राध्यापक शिवाजी मुळे सर कल्याण पाटील उदगीर उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी तहसीलदार वेंकटेश मुंडे उपस्थित होते या क्षेत्रांचे नुकसान झाले आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना शासनस्तरावरून काही मदत करता येईल का या संदर्भात लवकरच आढावा घेण्यात येणार आहे व त्यांना मदत करण्यात येणार आहे असे आश्वासन यावेळी दिले.