राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या प्रदेश सहसंघटनमंत्रिपदी अरविंद पत्की यांची निवड
उदगीर प्रतिनिधी
येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अरविंद मनोहर पत्की यांची राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या प्रदेश सहसंघटन मंत्री पदी निवड करण्यात आली असल्याचे पत्र त्याना नुकतेच पत्रा प्राप्त झाले आहे.राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी राजराजे श्वर गिरिजी महाराज यांचे आदेशाने महासचिव स्वामी डॉ. पद्मनाभ गिरिजी महाराज यानी श्री.अरविंद पत्की यांची महाराष्ट्र प्रदेश सहसंघटनमंत्री मठ मंदिर महाराष्ट्र पदी निवड केली आहे .श्री अरविंद पत्की हे गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक सामजिक कार्यात हिरिरीने सहभागी होतात. मराठवाडा जनता विकास परिषद,पाणी फाऊंडेशन,शैक्षणिक अशा क्षेत्रात त्यांचे भरिव कार्य आहे.रामकृष्ण पब्लिक स्कूलच्या माध्यमातून ते शैक्षणिक कार्यातही असून वृक्षारोपण करणे ती जगवने यात ते सदैव तत्पर असतात. उदगीर शहर व परिसरात आणि अनेक शाळा सार्वजनिक ठिकाणी त्यानी वृक्ष लागवड केली आहे.अरविंद पत्की पोलीस रिपोर्टर या पेपर चे पत्रकार होते नगर पालिका तहसील ऑफिस पोलीस स्टेशन शैक्षणिक व इतर ऑफिस चे प्रश्न सामंजस्याने सोडवले व आता हिमदुसम्राट दैनिक मध्ये लातूर जिल्हा विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवुन राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेवर त्यांची ही निवड करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचे प्रदेश प्रवक्ते सुयश शिवपुरी उपाध्यक्ष राजेंद्र जोशी बापूराव कुलकर्णी विवेक कुंभाजकर बालाजी नामप्ल्ले अनिल बिरादार पत्रकार शंकर बोइनवाड विपिन जाधव रविंद्र जोशी यांचेसह मित्र मंडळीने अभिनंदन केले आहे